Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar,Mahayuti sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : 'सीएम'पदानंतर आता फडणवीसांच्या गृह खात्याचीच डिमांड; शिंदे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा खटके ?

Political News : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत गुरुवारी रात्री महायुतीचे नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक होत आहे. त्यामध्ये राज्यातील सत्तावाटपाचे सुत्र निश्चित केले जाणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाले. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता लागली असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करीत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला होता. त्या स्वरूपाची घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बुधवारी केली. त्यांच्या या घोषणेने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत गुरुवारी रात्री महायुतीचे नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक होत आहे. त्यामध्ये राज्यातील सत्तावाटपाचे सुत्र निश्चित केले जाणार आहे. राज्यात मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यातच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून गृह खात्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mahayuti News)

राज्यातील मंत्रीमंडळातील सत्तेत कोणता पक्ष कोणते पद घेणार याची उत्सुकता लागली आहे. एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे त्या बदल्यात शिवसेना शिंदे गटाने गृह खात्यावर दावा केला असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

दिल्लीत होत असलेल्या या बैठकीत तीन घटक पक्षाकडून गृह, अर्थ, नगरविकास, महसूल, जलसंपदा, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, गृहनिर्माण, आरोग्य व परिवहन खात्यावर सर्वांची नजर असणार असून या पैकी महत्वाची खाते पदरात पाडुन घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे.

त्यातच आता ही बैठक सुरू होण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाने गृह खात्यावर दावा करीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे यावर भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच काही खाते बदलून घेण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. त्यामुळे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT