Priyanka Chaturvedi Sarkarnama
महाराष्ट्र

Priyanka Chaturvedi : 'बाबा सिद्दिकींची हत्या आजच्या महाराष्ट्राची स्थिती दर्शवते'; शिवसेना खासदार चतुर्वेदींचा घणाघात

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ही घटना म्हणजे, मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. स्टेट इंटेलिजन्स आणि मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता हल्ले होऊ लागले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ही घटना म्हणजे, "महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. महाराष्ट्र अशा स्थितीवर आणून ठेवला आहे की, तिथे न्याय व्यवस्था नाही, कायद्याचा धाक नाही, फक्त लूट सुरू आहे", असा घणाघात केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेतील तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडून जमावाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेशी निगडीत असलेल्या वेगवेगळी माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दिकी गेल्या चार दशकापासून राजकारणात सक्रिय होते. त्यांची अशापद्धतीने हत्या झाल्याचे त्याचे पडसाद राजकारणात आणि बाॅलिवूडमध्ये उमटू लागले आहेत.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्याच्या शांतता-सु्व्यवस्थेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या ही राजकारणाची वेळ नाही. परंतु महाराष्ट्रासाठी ही घटना देखील चांगली नाही. याचे पडसाद भविष्यात गंभीर असू शकतात, त्यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला पाहिजे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "बाबा सिद्दीकी यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध होते. एवढ्या चांगल्या राजकीय नेत्याची अशाप्रकारे हत्या होणे हे दुर्दैव आहे. याचबरोबर राज्यातील शांतता-सुव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झालेली दिसते. या घटनेशी निगडीत घटनाक्रम पाहिल्यास, त्यांना गेल्या 15 दिवसांपासून धमक्या येत होत्या. 'वाय' दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. पोलिस दलातील इंटेलिजन्स विभागाचं हे मोठं अपशय आहे. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच".

कायद्याचा धाक नाही

'महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना बघा, अक्षय शिंदे याला मारल्याने शांतता-सुव्यवस्था ठिक झाली, असे म्हणणारे आता कुठे आहेत? सत्ताधारी पक्षातील आमदारांची हत्या होणे हे खूपच दुर्दैवी घटना आहे. अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर देखील गोळीबाराची घटना झाली होती. आता चर्चा सुरू आहे, की बिष्णोई गँगची. मग अशावेळी स्टेट इंटेलिजन्सचं, मुंबई पोलिसांचं काय? जगभरात मुंबई पोलिसांचे कौतुक होते. त्यांच्या नाॅलेजची चर्चा होत असते. महाराष्ट्र अशा स्थितीवर आणून ठेवले आहे की, तिथे न्याय व्यवस्था नाही, कायद्याचा धाक नाही, फक्त लूट सुरू आहे', असा आरोप खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT