Chandrahar Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrahar Patil : ठाकरेंसह विशाल पाटलांची दिल्लीत भेट; चंद्रहार पाटील म्हणाले, "आता विधानसभेला..."

Pradeep Pendhare

Mumbai News : दिल्ली इथं उद्धव ठाकरे यांची विशाल पाटील, विश्वजीत कदम यांच्या भेटीवेळी चंद्रहार पाटील देखील होते. लोकसभा निवडणुकीनंतर ही एकत्रित भेट चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी माफ करत सांगलीबाबत काही सूचना केल्यात, विधानसभा निवडणूक एकीने लढायचे सांगितले आहे. यावर चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

"पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सगळीकडे लक्ष असते. सांगलीबाबत त्यांचे विशेष लक्ष आहे. विधानसभेला एकत्रित काम करून सांगली जिल्ह्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहोत. 8 पैकी 6 जागा महाविकास आघाडी विधानसभेत जिंकेल म्हणजे, जिंकेल", असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख सांगलीत लोकसभा केलेले राजकारणावरून माफ केले आहे. पुढे एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांनी चुका केल्या, त्यांनी निवडणूक विचार करायला पाहिजे होता. विशाल पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष किंवा काँग्रेस असेल, ज्यांनी काम केले नाही, त्याची माहिती पक्षप्रमुखांना दिली आहे. विधासभेला एकत्रित काम करण्याचा आता त्यांच्या सूचना आहेत. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यावर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहोत. 8 पैकी 6 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा चंद्रहार पाटील यांनी केला.

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा महाविकास आघाडी असून देखील मतदान झाले नाही. हा पराभव शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र तसे व्हायला नको, म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाने आता दिल्लीतून खटाटोप चालवला आहे. विशाल पाटील, विश्वजीत कदम आणि चंद्रहार पाटील यांची एकत्रित भेट घेऊन सांगलीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरेंचा सल्ला

दिल्लीमधील उद्धव ठाकरे यांच्याशी ही भेट सकारात्मक झाल्याचा दावा चंद्रहार पाटील यांनी केला. आम्ही तरुण मुलं आहोत. त्यावेळी घडायला नको होत ते झाले. पण तिथे भाजप जिंकला नाही, याचा आनंद आहे. चंद्रहार पाटील पडले, त्याचे दुःख आहे. पण तिथे भाजप जिंकला नाही, याचा आनंद आहे. विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून समोरे जातान भाजप जिंकणार नाही, असे काम करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिला आहे, असे चंद्रहार पाटील यांनी सांगितले. सांगलीतील निवडणूक अशी झाली

सांगलीची गाजलेली लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीत सांगलीची निवडणूक चांगलीच गाजली. देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाने सांगलीत आफला उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला. विशाल पाटील यांनी भूमिका ठाम ठेवत लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला. शिवसेना ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विशाल पाटील अपक्ष म्हणून मैदानात आले. भाजपकडून संजय पाटील मैदानात आले. मात्र विशाल पाटील यांनी मैदान मारलं. विशाल पाटील यांना काँग्रेसचे तरुण नेते विश्वजीत कदम यांचे बळ मिळाले. त्यामुळे विशाल पाटील यांना निवडणुकीत मोठं यश मिळाले. त्यांना 5 लाख 72 हजार 666 मते मिळाली, तर संजय पाटील यांना 4 लाख 71 हजार 613 मते मिळाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना 60 हजार 860 मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT