nilesh lanke ajit pawar sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar On Nilesh Lanke : नीलेश लंके शरद पवारांच्या पक्षात जाण्याची चर्चा अन् अजितदादा म्हणाले...

Nilesh Lanke Marathi News : नीलेश लंकेंच्या प्रवेशावरून अजित पवार गट अन् शरद पवार गटाता आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

Umesh Bambare-Patil

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं सोमवारचा दिवस ढवळून निघाला. सोमवार आणि मंगळवारी हा प्रवेश झाला नाही. पण, "राजकारणात कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगता येत नाही," अशी सूचक प्रतिक्रिया देत लंके यांनी उत्सुकता वाढवली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाष्य केलं आहे.

"नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्याबद्दल माध्यमांत चर्चा सुरू आहे, त्यात तथ्य नाही. लंकेंनी माध्यमांना काय सांगायचे, ते सांगितलं आहे. मीही त्यांची चर्चा ऐकली आहे. त्यामुळे मी उत्तर देण्याचं काही कारण नाही," अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी ( Ajit Pawar ) दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नीलेश लंके काय म्हणाले?

"आपण लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. मी लोकसभा निवडणूक लढवावी, ही अनेकांची इच्छा आहे. पण, अजून काही ठरलं नाही. राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही. खेळाडूला नेहमी तयार राहावे लागते," असं लंकेंनी ( Nilesh Lanke ) म्हटलं.

"लंकेंच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही"

नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची चर्चा रंगली असतानाच शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा, लंकेंच्या प्रवेशाबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले, "नीलेश लंकेंच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही. लंके पक्षप्रवेश करणार ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकतोय."

"लंकेंचा बळी दिला जात आहे"

अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी नीलेश लंकेंवरून महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. "दक्षिण नगरची जागा महायुतीत भाजपला मिळणार आहे. तर, महाविकास आघाडीनं रोहित पवारांना उभं राहण्यासाठी आग्रह केला होता. पण, तेथील परिस्थिती डोळ्यांनी पाहिल्यानंतर रोहित पवारांनी माघार घेत लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून लंकेंना गळ घालून लोकसभा लढण्यासाठी बळी दिला जात आहे," असं सुनील शेळकेंनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT