Ajit Pawar Death Hasan Mushrif Emotional  sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच हसन मुश्रीफ ढसाढसा रडले, 'आम्ही पोरके झालो...'

Ajit Pawar Death Hasan Mushrif Emotional :अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकताच मंत्री हसन मुश्रीफ यांना दुख: अनावर झाले. मुश्रीफ यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.

Roshan More

Ajit Pawar Death News : बारामतीत विमानतळावर विमानाच्या अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेण्यासाठी आले विमानाने बारामतीत आले होते.

अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकताच मंत्री हसन मुश्रीफ यांना दुख: अनावर झाले. मुश्रीफ यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून देताना 'अतिशय शिस्तप्रिय नेता गेला. ज्यांच्या जीवावर राजकारण करत होतो... आम्ही आता पोरके झालो आहोत.', असे म्हटले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'त्यांचे व्यक्तित्व दिलखुलास, रोखठोक अन् कार्यकर्त्यांना हवेहवेसे वाटणार होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुख: डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कामाची पद्धती, प्रशासनावरची पकड या महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील.'

दिल्लीवरून शरद पवार रवाना

शरद पवार,सुप्रिया सुळे,सुनेत्रा पवार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्व दिल्लीवरून बारामतीकडे रवाना झाले आहेत. पार्थ पवार हे देखील दिल्लीला होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT