Ajit Pawar death news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर, संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीत कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांना देखील या घटनेवर अश्रू अनावर झाले.
'अजितदादांनी माझ्यावर कधीच प्रेम कमी केलं नाही. शरद पवारसाहेबांबरोबर असलो, तरी त्यांनी माझ्यावर प्रेम करत राहिले,' असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.
अजितदादांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी घडवलेले नेत, कार्यकर्ते, यांना अश्रू अनावर झाले आहे. पवार कुटुंबियांतील प्रत्येक सदस्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल देशमुख, सरोज अहिरे, खासदार नीलेश लंके अशा शेकडो दिग्गज नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
अजितदादांच्या निधनावर नीलेश लंकेंना (Nilesh Lanke) अश्रू ढासळत प्रतिक्रिया दिली. अजितदादांचं असं जाण सर्वांसाठी वाईट आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील कार्यक्रमात आम्ही शेवटचो भेटलो होतो. ती आमची शेवटची भेट.
शरद पवार यांचे तुम्ही खासदार आहात, त्यावेळी अजितदादांबरोबर तुम्ही मैत्री कसे जपायचे. त्यावर नीलेश लंके यांनी, "विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना, मी त्यांचा जवळचा आमदार म्हणून होतो. दादांनी खूप मदत केली. माझ्या प्रत्येक कामाला अजितदादांची ताकद होती. राजकीय मतप्रवाह वेगळे झाले, तरी अजितदादांचे प्रेम आजपर्यंत कायम होते."
नीलेश लंके हे अजितदादांच्या खूप जवळचे होते. राष्ट्रवादी फुटीनंतर ते अजितदादांबरोबर होते. परंतु लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शरद पवार यांची साथ दिली. त्यावेळी अजितदादांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. पण नीलेश लंके निवडून आल्यानंतर अजितदादांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी दोघांची ही भेट चर्चेत आली होती.
आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत, असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड इथल्या महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या होत्या. त्यावेळी अजितदांदाची नीलेश लंके यांनी भेट घेतली होती. ही त्यांची शेवटची भेट ठरली. यानंतर दोन्ही राष्ट्रवादी राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला एकत्रित समोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.