Ajit Pawar Power in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : बैठकीनंतर अजितदादांचा शेतकऱ्यांना दिलासा; मदतीची रक्कम खात्यावर कधी जमा होणार, 'तारीख' थेटच सांगितली

Ajit Pawar farmers relief News : पुण्यातील साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीविषयी थेटच सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पॅकेज चार दिवसापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच आज पुण्यातील साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीविषयी थेटच सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. उद्या मी मुंबईला जाणार आहे. त्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करणार आहे. ज्याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्याठिकाणच्या जिल्हाधिकऱ्याचे अहवाल प्राप्त होण्याची वाट पाहत आहोत. त्यांचे रिपोर्ट प्राप्त होताच जो निधी पाठवायचा आहे तो निधी तयार ठेवला आहे. ताबडतोब डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील व्हीएसआय येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नाना उत्तरे दिली. यामध्ये साखर कारखानदारीतील डिस्टिलरी, को-जन आणि सौरऊर्जेसंबंधी समस्यांवर चर्चा झाली, असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर देण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. तसेच, रोपांची किंमत तीन रुपयांवरून दोन रुपये करण्यात आली असून, प्रति रोपाला एक रुपया प्रोत्साहन म्हणून दिला जाईल. ही योजना फर्स्ट कम फर्स्ट तत्त्वावर पाच हजार शेतकऱ्यांसाठी लागू असेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील मदतीबाबतही माहिती दिली. दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. त्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करून लवकरच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT