
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून दिवाळीनंतर केली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता लागली असतानाच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुती मुंबईत एकत्र तर इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल दिसत नाही. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षांची धाकधूक वाढली आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने धक्कातंत्र देण्याची तयारी सुरु केली आहे.
एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित लढण्याची शक्यता गृहीत धरून व त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष जाईल, असे गृहीत धरून काँग्रेसने (Congress) स्वबळाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सोमवारी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, यामध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला गेल्या काही दिवसापासून वेग आला आहे. गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेचे (Shivsena) मुंबई महापालिकेवर वर्चस्व आहे. त्यामुळे एकीकडे भाजपकडून जोरदार तरी केली जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ठाकरे बंधूकडून मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्याची तयारी सुरु केली असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
काँग्रेसच्या सोमवारी होत असलेल्या या बैठकीत मुंबई महापालिकेतील 227 जागासाठी इच्छुक नेत्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी आघाडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेश काँग्रेसला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी, मुंबईत शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्यास काँग्रेस यात सहभागी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या बैठकीत मुंबईतील सर्व जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे.
काँग्रेसकडून मुंबईतील सर्व जागांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती जागांवर निवडणूक लढविणार, हे ठरवले जाईल. परंतु, तूर्त तरी महाविकास आघाडीसोबत आहोत. याबाबत अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस काय निर्णय घेणार यावरून मित्रपक्षांची धाकधूक वाढली असून येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे ठाकरे बंधूंची वाढती जवळीकता पाहता येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेची युती होण्याची शक्यता आहे. या दोन पक्षामध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहे. त्यामुळे उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनकडून मनसेला आघाडीत घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडून त्याला काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीबाबत 'सस्पेन्स' कायम आहे. एका बाजूला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात असले तरी, महाविकास आघाडीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप पक्षाने जाहीर केलेला नाही. 'स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ', अशी भूमिका घेऊन काँग्रेसने वाटाघाटींसाठी अधिक ताकद मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मित्रपक्षांना दिला 'अल्टिमेटम'
काँग्रेसचा हा पवित्रा थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अल्टिमेटम मानला जात आहे. 'तुम्ही जागावाटपात जास्त तडजोड करा' असा अप्रत्यक्ष इशाराच काँग्रेसकडून देणारा आहे. जर काँग्रेसने खरोखरच काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली तर आघाडीच्या विजयाच्या शक्यतांवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. 'स्वबळाचा नारा' केवळ दबावतंत्र आहे की काँग्रेस खऱ्या अर्थाने 'एकला चलो रे'च्या मूडमध्ये आहे? याचे उत्तर लवकरच मिळेल, पण सध्याच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.