Ajit Pawar-Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil News : दादा, योग्यवेळी योग्य निर्णय; जयंत पाटील विधानसभेत असे का म्हणाले ?

Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनवेळी पुन्हा एकदा तेच पूर्वीच्या विधानसभेतील वातावरण दिसले. सभागृहात पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हशा, खसखस, चिमटे अन टोमणे ऐकायला मिळाले. त्यातच जयंत पाटलांनी केलेल्या त्या विधानामुले पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत असतानाच विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनवेळी पुन्हा एकदा तेच पूर्वीच्या विधानसभेतील वातावरण दिसले. सभागृहात पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हशा, खसखस, चिमटे अन टोमणे ऐकायला मिळाले. त्यातच जयंत पाटलांनी केलेल्या त्या विधानामुले पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (Jayant Patil News)

विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याच्या विधानसभेत सोमवारी पुन्हा एकदा हशा, खसखस, चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील (Jayant Patil) आणि जितेंद्र आव्हाड यांनी संधी मिळताच एकमेकांना चांगलेच टोले लगावले. त्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ पहावयास मिळला. त्यातच जयंत पाटील यांच्या दादा, योग्यवेळी योग्य निर्णय या सूचक विधानाने पुन्हा एकदा नव्या चर्चेला वाट मोकळी झाली आहे. त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्यविनोद रंगला. यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यासाठी त्यांनी 1990 चा एक किस्सा सांगितला.

त्यावेळी विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असे जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असे अजितदादानी त्यांच्या बोलण्यातील चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त केले. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मी आमदार झालो, असे म्हणत किती लक्ष आहे बघा माझ्यावर, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

जयंत पाटलांचे सूचक विधान

जयंत पाटील यांना दादांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिले. माझे लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय याकडे? असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे. दादा, योग्यवेळी योग्य निर्णय, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगली आहे.

तुम्ही कडक व्हा, सदस्यांना प्रोटोकॉल पाळायला सांगा

यापूर्वी अध्यक्ष उभे राहिले तर विधानसभेचे सदस्य आत येताना तिथेच उभे राहायचे. आता अध्यक्ष उभे राहतात, बोलतात. तरीही सदस्यांची सभागृहात ये-जा सुरू असते. आता तुम्ही कडक व्हा. सर्व सदस्यांना पत्र पाठवा. प्रोटोकॉल पाळायला सांगा. त्यात मीही आलो. खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्या. अमेरिकेत क्लॉक सिस्टिम आहे. पाच मिनिटं झाली की गजर होतो. सदस्य बोलायचे थांबतात. तुम्हीही स्टॉप वॉच ठेवा. सदस्यांना 10 ते 15 मिनिटांचा वेळ द्या, अशी सूचना जयंत पाटील यांनी अध्यक्षांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT