Mahayuti News : इच्छुकांची धाकधूक वाढली; मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरण्यास दिरंगाई

Political News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षात मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने येत्या काळात मंत्रीमंडळ विस्ताराला दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
Mahayuti's Leader
Mahayuti's LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षात मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने येत्या काळात मंत्रीमंडळ विस्ताराला दिरंगाई होण्याची शक्यता आहे. (Mahayuti News)

राज्यातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. लवकरच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. महायुतीमधील तीन घटक पक्षाने दावा केला असला तरी कोणाच्या वाटायला किती मंत्रीपदे येणार हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या नुसार खातेवाटप फायनल होणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला कधी ठरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Mahayuti's Leader
Shivsena UBT : 'शेख हसीना लाडकी बहीण पण बांगलादेशातील हिंदू भाऊ बहि‍णींचे काय?', उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

महायुतीमधील फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22, शिंदे शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला 12 आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला नऊ मंत्रीपदे दिले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला फायनल झाल्यांनतर खातेवाटपावर चर्चा हॊणार आहे. गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा या खात्यावरून तीन ही पक्षांत सध्या जोरदार रस्सीखेच आहे. त्यातच विधानपरिषदेच्या आमदारांना संधी दिली जाणार का यावरून मतभिन्नता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचे पुढे आले आहे.

Mahayuti's Leader
Shivsena News : खातेवाटपावरून शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मंत्रिपदाचे वाटप करताना...'

11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होणार होता मात्र काही अडचणीमुळे हा विस्तार आता 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तीन घटक पक्षाचे नेते नावे निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यामध्ये फायनल करण्यात आलेल्या नावावर चर्चा होणार आहे. त्यानंतर ती अंतिम यादी दिल्लीतील हायकमांडकडून मंजूर या प्रक्रियेमुळे याला विलंब होण्याची शक्यता आहे.

Mahayuti's Leader
Markadwadi Voting : मी आमदारकीचा राजीनामा देतो, ‘बॅलेट’वर माळशिरसची पोटनिवडणूक घ्या; जानकरांचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर सांगितले होते. त्यामुळे आता हा मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahayuti's Leader
Markadwadi Voting : मारकडवाडीच्या ठिगणीचा देशभरात वणवा पेटणार, दिल्लीत अभ्यास सुरू; पटोलेंनी सांगितली अंदर की बात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com