Ajit Pawar Budget Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar power politics : शेषराव वानखेडेंनंतर अजितदादाच! 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा 'हिमालयीन' विक्रम आता इतिहास जमा!

Ajit Pawar power politics News : राज्याचा सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम विदर्भातील बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावे आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar Political Journey : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. 44 वर्षापेक्षा अधिककाळ राजकारणात सक्रिय असलेल्या अजितदादांनी अनेक विक्रम केले आहेत. 8 वर्ष 278 दिवस ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. त्याशिवाय त्यांनी या काळात जलसंपदा, कृषी, ग्रामविकास, अर्थ, ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक सहावेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. तर दुसरीकडे राज्याचा सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम विदर्भातील बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावे आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

अजितदादांनी सहावेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीत आणि पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले आहे. तर दुसरीकडे राज्याचा सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम विदर्भातील बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावे आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प सलग 10 वेळा सादर केला असून पाटलांचा विक्रम अजित पवार यांनी 2025 चा अर्थसंकल्प मांडताना मोडला होता.

राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत अजित पवार (Ajit Pawar) हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना विद्यमान अर्थमंत्रीपदाचा कार्यकाल पुर्ण करता आला असती तर सर्वाधिक 15 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या नावावर विक्रम झाला असता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सलग 10 वेळा सादर केला आहे.

अजित पवार यांनी 2025 चा अर्थसंकल्प मांडताना जयंत पाटील यांच्या 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाचा उल्लेख करून त्यांचे कौतुकही केले होते. जयंत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या नेत्यांमध्ये बॅ. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनी 10 वेळा तर सुशीलकुमार शिंदे यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

फक्त घोषणा नाही, तर अंमलबजावणी! ही अजितदादांची ओळख निर्माण केली होती. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर राहून फाईल्सचा निपटारा करणारा हा अर्थमंत्री राज्याच्या तिजोरीचा खंदा रक्षक मानला जात होता. अजित पवार यांनी 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या ११ व्या अर्थसंकल्पात त्यांनी 'विकसित महाराष्ट्र' डोळ्यासमोर ठेवून अनेक मोठ्या आणि धाडसी घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. जरी त्यावेळी मानधनात वाढ झाली नव्हती, तरी ही योजना सुरू ठेवण्यावर भर दिला होता.

मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तांत्रिक क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद. तर 50 हजार शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर जमिनीवर प्रायोगिक तत्त्वावर 'एआय' आधारित शेती प्रकल्प राबवण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी 6,060 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यासोबतच जलयुक्त शिवार योजनेसाठी 5 हजार 818 गावांमध्ये 1.48 लाख जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी 4 हजार 227 कोटी रुपये मंजूर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT