Ambadas Danve On Budget  Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve News : मोठी बातमी : अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन

Vidhan Parishad News : विधानपरिषदेत सोमवारी झालेल्या गदारोळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषदेत सोमवारी झालेल्या गदारोळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली. या प्रस्तावावर विधान परिषदेत मतदान घेण्यात आले. हा ठराव बहुमताने संमत झाला.

ठराव संमत करण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा करावी यासाठी विरोधकांनी गदारोळ केला. दरम्यान, या गोंधळातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकत विरोधक सभागृहातून बाहेर गेले.

विधान परिषदेच्या सभागृहात सोमवारी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावर दानवेंनी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको अशी भूमिका घेतली. यानंतर दानवे आणि लाड यांच्यातला वाद टोकाला गेला.

यावेळी सभागृहात दानवे बोलत असतानाच प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करत तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही, असे म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज स्थगित केले होते.

या प्रकारानंतर सोमवारपासून सत्ताधारी मंडळींकडून अंबादास दानवेंचे (Ambadas Danve) निलंबन करावे, अशी मागणी केली जात होती. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरु करण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाने घोषणाबाजी केली. त्याशिवाय विधानपरिषदेत निलंबनाच्या मागणीसाठी भाजप (Bjp) आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच विधान परिषदेत या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले.

त्यावेळी हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. ठराव संमत करण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा करावी यासाठी विरोधकांनी गदारोळ केला. दरम्यान, या गोंधळातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज सुरू ठेवले . त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. यानंतर विरोधक सभागृहातून बाहेर गेले.

विरोधी पक्ष आक्रमक

दानवेंना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. निलंबन झाल्याने त्यावर बोलता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये उतरले. अशा ठरावावर कधीही चर्चा झाली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बोलण्याची संधी न दिल्याने विरोधकानी सभापती हाय हाय, न्याय द्या .. न्याय द्या घोषणा दिल्या. तरीही कामकाज सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. यानंतर विरोधक सभागृहातून बाहेर गेले.

यानंतर उपसभापती गटनेत्याच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. आपण दुःखी अंतःकरणाने हा निर्णय घेतला आहे. अशा ठरावावर कधीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाची मागणी चुकीची होती, असे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर राज्यपालाच्या अभिभाषनावर चर्चा सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT