Pune News : पुणे जिल्ह्याचा राजकीय दृष्ट्या वजन वाढला आहे. जिल्ह्यात सध्या 25 आमदार आणि 7 खासदार झाले आहेत. तसेच केंद्रीय राज्य मंत्रीपद, राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि विधान परिषदेचे उपसभापती पद अशी तीन महत्त्वाची पदेही पुण्याकडे आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संसदीय पद असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून विधानसभेवरती 21 आमदार निवडून जातात. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि पिंपरी-चिंचवड येथील उमा खापरे याही विधान परिषदेवर आहेत. तसेच भाजपने नुकतेच विधान परिषदेसाठी जिल्ह्यात अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांची उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता पंचवीस वर जाणार आहे.
त्याशिवाय, जिल्ह्यात लोकसभेच्या बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे शहर अशा 4 जागा आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेवर जिल्ह्यातून प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना पाठवला आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेतच. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खासदारांची संख्या आता 7 झाली आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सध्या जिल्ह्यातील नेते अनेक महत्त्वाची पद भूषवत आहेत. लोकसभेवर प्रथमच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात थेट राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सहकार महत्त्वाच्या खात्याबरोबर नागरी विमान वाहतूक खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात. त्याचबरोबर डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्याकडे विधान परिषदेचे उपसभापतीपद आहे. हे पद घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या पदावर ती राहून त्या थेट मंत्री किंवा एखाद्या खात्याला त्या थेट आदेश देऊ शकतात. तर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खात्याची देखील जबाबदारी आहे.
जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने संसदीय पदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे खासदार व आमदार वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करत असले तरी जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एकत्रित प्रयत्न केले तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागू शकतात असं तज्ञांचे मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.