Sushma Andhare has demanded investigation of Eknath Shinde CDR Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat case: देवाभाऊ, एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? सुषमा अंधारे संतापल्या

Sushma Andhare has demanded investigation of Eknath Shinde CDR: अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी करत देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले.

Mangesh Mahale

Ashok Kharat Case: नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचा खरा मुखवटा जगासमोर आल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. खरात याच्याकडून पोलिसांनी 58 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केल्याची माहिती होती. पण असे 100 व्हिडिओ असल्याचा संशय पोलिसांना आहे,

एका 35 वर्षीय महिलेने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिल्यानंतर खरात याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करीत आहे. एसआयटीचे नेतृत्व आयपीएस तेजस्वी सातपुते या करीत आहेत. खरात यांच्याकडे अनेक नेत्यांची उठबस होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा खरात याचा फोटोही व्हायरल होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी करत, राजकीय संबंधांच्या चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

खरात याच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा पूजा करतानाचा फोटो माध्यमांसमोर आला आहे, शिंदे यांचा या प्रकरणात हस्तक्षेप होता,असा आरोप अंधारे यांनी केला आहे. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला जात होते, अशा सर्व राजकीय व्यक्तीचा तपास गृहखाते करणार का? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये मध्ये मिरगाव येथील मंदिराला भेट दिली होती, त्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. याच मुद्यावरून सुषमा अंधारे यांना सवाल विचारण्यात आला.

एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का ? कारण एकनाथ शिंदे हे ज्यांच्याकडे नेहमी जातात, त्या अमित शाह यांच्यासबोत कॅप्टन खरात याचा फोटो आहे जयंत पाटील , नार्वेकरांचीही चौकशी करा,अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. खरात याच्या फार्महाऊसवर छापा टाकून पिस्तूल व संशयास्पद कागदपत्रे पोलिसांन जप्त केली आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

खरात याचा या नेत्यांशी संपर्क?

रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके या नेतेमंडळींचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संपर्क होता.याबाबत अनेक फोटो, तसेच व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचेही खरातासोबतचे काही फोटो समोर आल्याचे वृत्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT