Ashok Kharat Case News update: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता शासकीय अधिकारी अडचणीत सापडले आहेत. शासनाने अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. अशोक खरातसोबत पत्नीने केलेली गुंतवणूक त्याला भोवली आहे.
सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा कँप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कारनामे सभागृहात वाचून दाखवले, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
त्यानंतर प्रशासनाने तातडीने संबधीतांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. खरात प्रकरणाशी संबधीत असलेल्या सनदी अधिकाऱ्याला पहिला दणका बसला आहे. त्यामुळे आता खरातला मदत करणाऱ्या मंत्रालयातील अन्य अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या खरातशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अशोक खरातच्या मुलीबरोबर उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची जमिनीची भागीदारी आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप आणि उघड भागीदारी असल्याचे तपासात आढळले आहे. आता अभिजित भांडे यांना महसूल व वन विभागात रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे.
अभिजीत भांडे आणि अशोक खरात आणि यांच्यात काही व्यवहार झाल्याचे धागेदोरे एसआयटी तपासात समोर येत आहे.नाशिकच्या पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेत अभिजीत भांडे-पाटील यांच्या पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मुलीचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. या सातबारावर प्रिती भांडे आणि तृप्तबाला खरात यांची नावे दिसत आहेत.
काल (२४ मार्च २०२६) महसूल आणि वन विभागाने विशेष आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मुंबईतील वांद्र्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती लोकहितास्तव तातडीने संपुष्टात आणली आहे. त्यांना २४ मार्चच्या दुपारनंतर सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.