Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणात सनदी अधिकारी गुंतले; पुरावे समोर, अभिजीत भांडेंची पत्नी अन् खरातचा एकत्रित...

Ashok Kharat Case SIT Investigation News:अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासादरम्यान सनदी अधिकारी अभिजीत भांडे यांच्या पत्नी आणि तृप्तबाला खरात यांचा संयुक्त सातबारा समोर आला.
Ashok Kharat arrest
Ashok Kharat arrestsarkarnama
Published on
Updated on

SIT investigation in Ashok Kharat case: नाशिकमधील अशोक खरात प्रकरण हे हिमनगाचं टोक असून अद्याप बऱ्याच गोष्टी बाहेर येत असल्याचे तपासात उघड होत आहे. खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व राजकीय, प्रशासकीय व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आता या प्रकरणात खरात याच्या जमीन व्यवहारात एक सनदी अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. आणखी कोणते अधिकारी यात गुंतले आहेत याचा शोध घेतला जात आहे.

खरात प्रकरणामुळे सनदी अधिकारी अभिजीत भांडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अभिजीत भांडे आणि अशोक खरात आणि यांच्यात काही व्यवहार झाल्याचे धागेदोरे एसआयटी तपासात समोर येत आहे.

नाशिकच्या पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेत अभिजीत भांडे-पाटील यांच्या पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मुलीचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. या सातबारावर प्रिती भांडे आणि तृप्तबाला खरात यांची नावे दिसत आहेत. त्यामुळे आता भांडे यांचे भांडाफोड झाल्यानंतर त्याचे पाय खोलात असल्याचे सध्याचे चित्र आहे . साम टिव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Ashok Kharat arrest
Ashok Kharat Case: अशोक खरातला एक चुक नडली! पोलिसांच्या जाळ्यात अडकला! बायको अन् मित्राने...

आरोपी अशोक खरातने केवळ महिलांचं लैंगिक शोषणच नाही केलं तर त्याने तुर्की मधाच्या नावाखाली खरातने अनेक नामांकित उद्योजक आणि राजकीय नेत्यांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

Ashok Kharat arrest
Ashok Kharat News: खरातचा नवा कारनामा समोर! कंबरेला बंदूक लावून दर शनिवारी, रविवारी कुठे जात होता...

'एल्विश हनी' नावाच्या मधाची विक्री अशोक खरात हा करायचा. हे मध अतिशय दुर्मिळ असून ते तुर्कीमधील खोल समुद्रात असलेल्या गुहेतून काढले जाते, असा दावा तो करीत होता. त्यांच्याकडे येणाऱ्या लैंगिक समस्या किंवा शारीरिक कमजोरी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करून, हे मध अत्यंत कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचं सांगून तो त्यांची दिशाभूल करायचा. १ किलो मधाच्या बाटलीसाठी तो तब्बल ९ लाख रुपये उकळत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

खरात याने सामान्य व्यक्तींसोबतच अनेक मोठे उद्योजक, राजकीय नेत्यांनाही फसवले आहे. लैंगिक अडचणींवर खात्रीशीर उपाय म्हणून खरात या 'एल्विश हनी' मधाची जाहिरात करीत होता. प्रतिष्ठीत व्यक्ती आपल्या समस्या उघडपणे सांगू शकत नसल्याचा फायदा घेत, त्याने या मधाच्या विक्रीतून बक्कळ पैशा कमवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com