Ashok Kharat Case: अशोक खरातला एक चुक नडली! पोलिसांच्या जाळ्यात अडकला! बायको अन् मित्राने...

Ashok Kharat case news update: आपल्या 'कारनामा' जनतेपर्यंत पोहचला आहे, हे माहीत असूनही खरात याने आपले काळे धंदे सुरुच ठेवले, पत्नी, मित्र परिवाराने त्यांना समजावून सांगितले होते, पण त्यांच्या सल्ला न मानता तो आपले 'मायाजाल' पसरवतच राहिला.
Ashok Kharat case news update
Ashok Kharat case news update Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case News Update :महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय बडे नेते, अधिकारी यांच्याशी जवळीक असलेला भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरात याच्या अटकेने खळबळ उडाली आहे. आज विरोधकांनी खरात यांची 'फाईल' अधिवेशनात 'ओपन' केली. त्यांच्या कारनाम्यांनी अनेकांना धक्का बसला आहे.

यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला असता, पण राजकीय वरदहस्त असल्याने तो मोक्काटच होता. नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांच्या 'आर्शीवादाने' त्याच्याविरोधात तक्रार देण्यास कुणीही धजावत नव्हते. आपण काहीही केले तरी आपले कुणी काहीही करु शकत नाही, हा अहंकारच त्याला खेट जेलपर्यंत घेऊन गेला.

आपला 'कारनामा' जनतेपर्यंत पोहचला आहे, हे माहीत असूनही खरात याने आपले काळे धंदे सुरुच ठेवले, पत्नी, मित्र परिवाराने त्यांना समजावून सांगितले होते, पण त्यांच्या सल्ला न मानता तो आपले 'मायाजाल' पसरवतच राहिला.

Ashok Kharat case news update
Ashok Kharat News: खरातचा नवा कारनामा समोर! कंबरेला बंदूक लावून दर शनिवारी, रविवारी कुठे जात होता...

खरातच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ खुद्द त्याच्याच मोबाईलवर काही महिन्यांपूर्वी त्याला आले होते. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्याला 'विषय वाढवण्यापेक्षा देवाण-घेवाण करून हे प्रकरण येथेच मिटव," असा सल्ला त्याला दिला होता. त्यांची पत्नी कल्पना यांनी खरातला खूप समजविण्याचा प्रयत्न केला नाही. पण, त्याने मित्र आणि पत्नीच्या सल्लामानला नाही."

"मोठे लोक माझ्या पाठीशी आहेत, मला कोणाची भीती नाही," असे सांगत त्याने आपला 'उद्योग'सुरुच ठेवले. नंतर अनेक मोठ्या व्यक्तीसोबत असलेल्या ओळखीच्या अहंकारातून खरात अडकला गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Kharat case news update
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

पीए रमेश हिंगे फरार...

एसआयटीकडून या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. खरात यांच्या कार्यालय आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. खरातचा पीए रमेश हिंगे फरार हा यातला महत्वाचा दुवा असून SIT कडून त्याची शोध सुरु आहे. हिंगे हा खरातचा अत्यंत निकटवर्तीय असल्याची माहिती मिळते आहे. अशोक खरातचे सर्वप्रकारचे आर्थिक व्यवहार आणि संपर्क व्यवस्थापनात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याची शक्यता तपास पथकानं व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com