Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खरात प्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधिमंडळ अधिवेशनावेळी खरात प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारलाही पाणी दिल्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरले जात आहे. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे व शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे या महिला नेत्यात जुंपली आहे. म्हात्रे यांनी ट्विट करत थेट ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केले. त्यामुळे, सुषमा अंधारेंनी म्हात्रेंवर पलटवार केला आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी खरात प्रकरणावरुन 'ताज का राज', ताज हॉटेलमध्ये बैठक कोणाची झाली असा सवाल केला आहे. अशोक खरातला कोणी ही पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? असा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केले.
या ट्विटनंतर तसेच उत्तर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिले आहे. अहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असे तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सुर्वे प्रकरणातला, त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? असा सवाल अंधारे यांनी म्हात्रेंना उद्देशून केला. त्यावर, म्हात्रेंनीही रिप्लाय दिला आहे.
सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही ? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना,ताई?, असे शितल म्हात्रेंनी म्हटले आहे.
त्यासोबतच, ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या, वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या. त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – 'ताज का राज', असेही म्हात्रेंनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.