Rupali Chakankar : खरातसोबत व्हिडिओत असलेल्या महिलेची चौकशी करताच चाकणकरांचा हस्तक्षेप; अनावश्यक प्रश्न म्हणत पोलिसांनाच धमकावलं...

Rupali Chakankar controversy in Ashok Kharat case : सध्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ नितीन जाधव व्हायरल करत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिर्डीतील एका पीडितेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनेंतर पोलिसांनी या पीडितेला जबाबासाठी बोलावले.
Ashok Kharat Case | Rupali Chakankar
Ashok Kharat Case | Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Mar : भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर भोंदूबाबाशी जवळीक असल्यामुळे आणि त्याला गुरू मानल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

शिवाय अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अशोक खरातचे काळे कारनामे समोर येण्याआधीच त्याच्या सर्व प्रकरणांची माहिती रुपाली चाकणकरांना होती. मात्र, त्यांनी ही माहिती बाहेर काढण्याऐवजी ते बाहेर आणू इच्छिणाऱ्या पोलिसांवरच दबाव आणल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील एका प्रकरणात पीडितेचा जबाब घेण्यावरून चाकणकरांनी पोलिसांवर दबाव आणल्याचं समोर आलं आहे. चाकणकरांचा हस्तक्षेप संशयास्पद वाटल्यामुळे नगर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती थेट पोलीस महासंचालकांना दिली आणि त्यानंतर खरातवर पाळत ठेवली गेली आणि त्यानंतर त्याच्या काळ्या कारनाम्याचा भांडाफोड झाला.

नेमकं प्रकरण काय?

सध्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ नितीन जाधव व्हायरल करत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिर्डीतील एका पीडितेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनेंतर पोलिसांनी या पीडितेला जबाबासाठी बोलावले. यावेळी चौकशी दरम्यान पोलिसांनी तिला खरातशी असलेल्या संबंधांविषयी प्रश्न विचारले असता ही महिला चिडली व तिने चाकणकरांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली.

Ashok Kharat Case | Rupali Chakankar
Satara ZP controversy : पत्नी झेडपी अध्यक्ष होताच महेश शिदेंचा कॉन्फिडन्स वाढला, थेट मंत्री शंभुराज देसाईंना घेतलं अंगावर

त्यानंतर चाकणकरांनी पोलिसांना अनावश्यक प्रश्न का विचारता म्हणून पोलिसांनाच फैलावर घेतले. त्यावर पोलिसांनी व्हिडिओ खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्यासाठी प्रश्न आवश्यक असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी पोलिसांवरच कारवाई करण्याची धमकी दिली आणि पीडितेने थेट राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली.

तर ही तक्रार चाकणकरांनीच करायला लावल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. शिवाय या तक्रारीच्या आधारावर शिर्डी पोलिसांविरुद्ध कारवाई करू, अशी धमकीही चाकणकरांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय राज्य महिला आयोगाने महिलेच्या तक्रारीवरून ९ मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाण्याला नोटीस देखील पाठविली होती.

Ashok Kharat Case | Rupali Chakankar
Raj Thackeray news : भोंदूबाबा खरात प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, माझ्या तर कानावर असं येतंय की, कोणाच्या तरी...

त्यामुळे या प्रकरणी संशय बळावलेल्या पोलिसांनी नाशिकला जाऊन खरातची माहिती गोळा केली. शिवाय या प्रकणाचं गांभीर्य लक्षात येताच नगर पोलीस दलाने थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना ही माहिती दिल्यावर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि खरातला बेड्या ठोकल्या.

मात्र, या सर्व आरोपांवर अद्याप रूपाली चाकणकर यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, खरातचे कारनामे समोर येण्याआधीच चाकणकरांना सर्व प्रकरणाची माहिती होती. तरी त्यांनी त्याचा भांडाफोड का केला नाही, शिवाय त्याला मदत होईल अशी भूमिका का घेतली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com