Rupali Chakankar, dattatray Bharne  Sarkarnam
महाराष्ट्र

Ashok Kharat case: चाकणकरांचा राजीनामा पडताच दत्तामामांचा 'युटर्न'; म्हणाले, 'भोंदूबाबाला सोडू नका...'

Dattatray Bharane statement News : रुपाली चाकणकर यांना सुरुवातीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सरकारनामा ब्युरो

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशोक खरात यांच्यासोबत राजकीय व्यक्तींचे फोटो बाहेर येत असल्याने विरोधकांनी सत्ताधारी मंडळींना चांगलेच घेरले आहे. त्यातच रुपाली चाकणकर यांना सुरुवातीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर दबाव वाढल्यानंतर चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी रुपाली चाकणकर यांच्या विषयवर बोलताना यापूर्वी पाठ राखण करणाऱ्या पूर्वीच्या विधानावरून दत्तात्रय भरणे यांनी युटर्न घेतला.

राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी चार दिवसापूर्वीच रुपाली चाकणकर यांची पाठराखण केली होती. मात्र आता हा विषय आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा सूर एकदम बदलल्याचे दिसले. अशोक खरात प्रकरणात सर्वात पहिल्यांदा जेव्हा रुपाली चाकणकर यांचे नाव आले. त्यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. या प्रकरणात चाकणकर यांचा काही दोष नाही. चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत. कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील महाराजाचे दर्शन झाले असेल किंवा त्या भेटल्या असतील. यामध्ये रूपाली चाकणकर (Rupali Chkanakar) यांची कुठलीही चूक नाही, असे दत्तात्रय भरणे म्हणाले होते.

त्यानंतर शनिवारी प्रसार माध्यमाशी बोलताना भरणे मामा म्हणाले, 'मी यापूर्वी जेव्हा बोललो होतो, तेव्हा मला अशोक खरात याच्याबाबत जास्त माहिती नव्हती. मला एकंदर हे प्रकरणही माहिती नव्हते. पण त्यानंतर कळाले की, अशोक खरात हा भोंदूबाबा आहे. अशा मंडळींना वेगळ्याप्रकारे ठोकून काढले पाहिजे. महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत. पण 100 पैकी एखादवेळी अशी गोष्ट घडते आणि तेच तेच वाजवले जाते. काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात. मला त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून मी त्यावेळी तशी प्रतिक्रिया दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही कुठलाही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात असतो. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी जवळ केले नाही. अशोक खरात कोण आहे, हे मला माहिती नव्हते. या लोकांना ठोकून काढले पाहिजे. जेणेकरुन इतर कोणताही महाराज असे कृत्य करणार नाही. हे महाराज लोकांना फसवतात, नादी लावतात. काही लोक त्यांचा प्रचार करतात. पण खरात भोंदूबाबा आहे. मला माहिती नव्हतं तो कसा आहे, मी सहज बोलून गेलो होतो, असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी मध्ये जे काही बाहेर येईल ते समजेल. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. खरात अत्यंत चुकीचा माणूस असून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी खरात याची बाजू कधीच घेणार नाही. राज्यात अंधश्रद्धा कायद्याचा वापर होत नाही. आता या प्रकरणातून शिकायला मिळेल. आता तरी या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शासन यापुढे काळजी घेईल, असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT