Rupali Chakankar News: सर्वात मोठी बातमी: रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

NCP News: महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या भोंदूबाबा अशोक खरातसोबत चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या भोंदूबाबा अशोक खरातसोबत चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर त्यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम्यासाठी मागणी जोर धरू लागली होती. अखेर शुक्रवारी(ता.27 मार्च) त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Rupali Chakankar
Mahavitran News: वीजग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी! महावितरणचा प्रस्ताव मंजूर, नव्या आर्थिक वर्षात दरकपात होणार

सोशल मीडियावर पोस्ट ..?

रुपाली चाकणकर काय सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं चाकणकरांनी स्पष्ट केलं आहे.

Rupali Chakankar
Satara ZP Update : सातारा ZP अध्यक्ष निवडणुकीबाबत जयकुमार गोरेंची प्रथमच कबुली; ‘जशी निवडणूक व्हायला पाहिजे होती, तशी ती झाली नाही...’

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद कायम होते. विरोधकांकडून खरात प्रकरणात गंभीर आरोप होताना चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक गट प्रचंड आक्रमक झाला होता.

त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली होती. पक्षाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत निम्म्याहून जास्त आमदारांसह नेत्यांकडून पक्षाची बदनामी रोखायची असेल तर चाकणकर यांचा राजीनामा घेणेच योग्य राहील, अशी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com