Nashik News: नाशिकचा भोंदू अशोक खरातची गुरुवारी पुन्हा पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. एसआयटी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. दोन दिवसापासून खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने धक्कादायक कबुली दिल्याची माहिती आहे.अनेक खुलासे केले आहे.
SIT कडून हर्षवर्धन खरातवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पण त्याने 'सर्व डॅडला माहिती, मात्र घरात खूप कॅश यायची'अशी धक्कादायक माहिती दिली आहे. या माहितीमुळे खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे.
मुलाने दिलेल्या या उत्तराने अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA) येथे खरातच्या मुलाची चौकशी सुरू आहे.
सोनं खरेदी कुठून व्हायची, घरात नेमके किती पैसे असत? लग्नासाठीचं सोनं कुठून घेतलं, कुठे विकले असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. वडिलांसोबत तू किती वेळा परदेशात गेला होता? वडील तंत्रमंत्र करायचे का? आई पैसे कोणाक़डे द्यायची असे अनेक प्रश्न खरातच्या मुलाला पोलिसांनी विचारले. त्याने "जे काही आहे ते डॅडला माहिती," असं सांगत आपल्याला या प्रकरणाबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले.
हर्षवर्धनने दिलेल्या कबुली जबावाने पोलिसांचे संशयाची सुई आता हवाला रॅकेटकडे वळली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरातचे रोख रक्कम कोठून येत होते, या दिशेने पोलिस आता तपास करीत आहे.
अशोक खरातची बायको कल्पना खरात ही फरार असून एसआयटीचे पथक तिच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरात अद्याप सापडली नाही. तिच्याविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.