Ashok Kharat News: मनोज जरांगे यांच्यासोबत खरातचा फोटो? हाके म्हणतात, "फडणवीसांनी खरातची जात सांगावी...

Ashok Kharat Photo with Manoj Jarange Sparks Row:अशोक खरात आणि मनोज जरांगे यांच्या फोटोमुळे वाद निर्माण झाला असून लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Laxman Hake Vs Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat photo with Manoj Jarange Patil controversy: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. खरात याच्यासोबत विविध राजकीय नेत्यांच्या संबंध असल्याबाबतचे आरोप केले जात आहे.

या आरोपांसोबतच काही नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा खरात याच्या सोबतचा एक फोटो समोर आला आहे. त्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.

अशोक खरात (भोंदू बाबा) यांच्यावर पीडित महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यांचे काही धक्कादायक कारनामे जसे हवाल्या रॅकेट उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत असल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, "महाराष्ट्रात एखाद्या बलात्कारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाची कुणीही व्यक्ती जात शोधत नाही. कुठलीही जात गुन्हेगाराचं अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करत नाही. मात्र यापूर्वी गुन्हेगार समोर आल्यानंतर त्याची जात शोधून टीका करणारे नेते आता का? बोलत नाहीत.

जरांगे पाटील आता भोंदूबाबा खरात बद्दल का? बोलत नाही हे त्यांना विचारणं आवश्यक आहे. उठ सूट प्रत्येक गोष्टीमध्ये भूमिका घेणारे आता या प्रकरणात गप्प का ? आहेत हे शोधणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातची जात सांगावी खरात आडनावामुळे सगळ्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकतो.. खरात प्रकरणांमध्ये मनोज जरांगे गप्प का आहेत त्यांनी आवाज का उठवला नाही.

खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. खरात बरोबर ज्यांचे फोटो आहेत. त्या सगळ्यांवर कारवाई करावी अख्ख मंत्रिमंडळ खाली होईल आणि या सगळ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com