Dharashiv News : भोंदूबाबा अशोक खरात यांचे दिवसागणीस नवे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात असल्याने त्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. खरात याचे अनेक राजकीय नेत्याशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यातच तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या सारख्या विकृत मनोवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यास यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. तुळजापूर येथे त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
भोंदूबाबा अशोक खरातने हजारोंच्या घरात खरातने महिलांवर अत्याचार केला. महिला मानसिक धक्क्यात आहेत. काही मोबाईल फोन खरात वापरत, त्या फोनमध्ये महिलांचे नंबर इतर नावाने सेव्ह असत. अशोक खरात याला अजिबात सोडू नये, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, अशी मागणी सुनील तटकरे (Sunil tatkre) यांनी केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातने ज्या प्रकारे महिलांचे शोषण आणि लोकांची फसवणूक केली आहे, ते पाहता त्याला कायद्यानुसार 'फाशीची शिक्षा किंवा कठोरतम दंड मिळाला पाहिजे. अशा प्रवृत्ती समाजात असणे घातक असून अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
भोंदू अशोक खरात प्रकरणाची राज्य सरकारने एसआयटीच्या माध्यमातून सखोल चौकशी करीत आहे. ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही सुनील तटकरे म्हणाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले, असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्रिमंडळातील सहकारी सॊमवारी बारामतीत उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आम्ही विनंती केली होती. पण, पूर्वनियोजित कार्यक्रममुळे ते येऊ शकणार नाहीत. पण, त्यांचा प्रतिनिधी येईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.