Ashok Kharat Case Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री? हवाला रॅकेटचे SIT च्या हाती लागले सबळ पुरावे; भ्रष्ट अधिकाऱ्यांनीच पुरवली रसद

Ashok Kharat Ran Hawala Racket: अशोक खरात प्रकरणात हवाला रॅकेटचे महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती लागले आहेत. या तपासात आता EDची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Ashok Kharat News Update: अशोक खरात याला अटक करून आज १० दिवस झाले, तपासात त्याच्या काळ्या कृत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. पोलिसांनी आव्हान केल्यानंतर खरातकडून फसवणूक झालेल्या अनेक व्यक्ती तक्रार देण्यासाठी पुढे येत आहे.

खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हेल्पलाइन नंबरवर तक्रारींचा पाऊस पडत आहे. त्यांच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश होत आहे. SITच्या हेल्पलाइन नंबरवर आतापर्यंत १०० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये ७० टक्के तक्रारदार महिला असल्याचे सूत्रांकडून समजते.

गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली

खरातकडून फसवल्या गेलेल्या महिला, त्याने फसवूक केलेल्या व्यक्ती आता समोर येत असून खरातच्या विरोधात तक्रारी दाखल करीत दाखल होत आहेत. काल (शुक्रवारी) रात्री उशिरा पुन्हा त्यांच्या विरोधात दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

डिजिटल पुरावे

SITकडून खरातचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. हा तपास करीत असताना एसआयटीच्या हाती महत्वाचे कागदपत्रे लागले आहेत.बँक ट्रान्झॅक्शन्स, व्यवहारांच्या काही डायऱ्या, डिजिटल पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत.यावरुन खरात काळे कारनामे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होते, असे प्राथमिक तपासात दिसत आहे.

दुबई कनेक्शन

अशोक खरातच्या या हवाला व्यवहारांचे धागेदोरे थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मुख्यत: दुबईपर्यंत पोहोचले असल्याचे दिसते. त्यांच्या बँकांचे आर्थिक व्यवहार तपासले असता भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे दिसते.

ईडीकडून तपास

आर्थिक व्यवहार करताना त्याने काही खाजगी एजंटस्ला हाताशी धरुन गैरमार्गाने लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचे एसआयटीला आढळले आहे. त्याने परकीय चलन विनिमय कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याची शक्यचा नाकारता येत नाही. या प्रकरणाची आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालय (ED) एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ईडीकडून खरातची आर्थिक फाईल ओपन होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

खरातचे काळे कारनामे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माहीत होते. या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात खरातला मदत केली होती, असे सुत्रांनी सांगितले. राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी यांच्या जीवावर खरात हवाला रॅकेट चालवत असावा, असा एसआयटीला संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT