Bajrang Sonwane Ajit Pawar .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Bajrang Sonwane News: बीडच्या खासदाराचं धक्कादायक विधान; म्हणाले, 'अजित पवारांचं विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच...'

Beed NCP Politics: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.6) माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठा शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय व्यक्त करत तपासाची मागणी केली आहे.

Deepak Kulkarni

Beed News: राज्याचें दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्टाचं मोठं राजकीय नुकसान झाल्याची जनभावना आहे. याचदरम्यान, दुसरीकडे अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत घातपाताची शंका उपस्थित केली जात आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसह, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी बाकावरील काँग्रैस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांकडूनही गंभीर आरोप केले जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.6) माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठा शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय व्यक्त करत तपासाची मागणी केली आहे. ते म्हणाले, विमान अपघाताचा व्हिडीओ मी पाहिला आहे. विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच त्याचा पहिला स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर विमान इंजिनच्या भागाकडचे लोक बाहेर फेकले गेले, त्यानंतर विमान जमिनीला टेकले आणि दुसरा स्फोट झाला, दोन स्फोट झाल्यामुळे या घटनेवर शंका येणार नाही का? असं सोनवणे यांनी म्हटलं आहे. 

खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले आहे. त्यात विमानाचा दोन वेळेस ब्लास्ट झाला, मग विमानामध्ये बॉम्ब होता का,याच बॉम्बने विमान उडवलं गेलं का, यावेळी नेमकं काय घडलं आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

तसेच या प्रकरणात घात की अपघात याचीदेखील चौकशी झाली पाहिजे आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले पाहिजेत. ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे.माध्यमांमध्ये डीसीजीच्या हवाल्याने सुरुवातीला सहा लोकं मृत डिक्लेअर करण्यात आली, नंतर मग एक कुठे गेला अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. त्यामुळे अजित पवार घरून निघाले, तेव्हापासूनचे तर ते एअरपोर्टवर पोहचले तोपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले पाहिजे, असंही रोखठोक मत सोनवणे यांनी व्यक्त केलं.

सोनवणे म्हणाले, परमेश्वरासारखं प्रेम ज्या नेत्यावर केलं, ते अजित पवार आज आपल्यात नाहीत, याचं दुःख कायम आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. मात्र सुनेत्रा पवार यांनी मंत्रीपदाची शपथ त्याच वेळी का घेतली, यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात, त्यावर बोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा घेतील का, या चर्चांवरही सोनवणे यांनी विराम दिला आहे. शरद पवार हे कालही पवार कुटुंबाचे प्रमुख होते आणि आजही आहेत. यामध्ये कोणतीही शंका नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मला घडवण्यात अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशी माझा संबंध हा 1999 पासून आला. अजितदादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट दुःखात आहे, देश दुःखात आहे. हा सर्व नियतीचा खेळ असल्याचंही सोनवणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. केज येथील येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे यावेळी सोनवणे यांनी जाहीर केले.

अजितदादांच्या या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल असे संपूर्ण बीड जिल्ह्यात नसेल, असं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे सोनवणे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणावर मी भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही. दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असं आम्ही काम करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT