Kolhapur Mayor : एक नगरसेवक असलेल्या पक्षाची थेट सत्तेच्या मुख्य वर्तुळात एन्ट्री; CM फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याने गेम फिरवला

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेत एका नगरसेवकाच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने थेट सत्तेत प्रवेश करत उपमहापौर पद मिळवले, ज्यामुळे शहराच्या राजकारणात मोठा उलटफेर घडला.
 Kolhapur Mayor Election News Update anasurajya Shakti’s Akshay Jarg becomes Deputy Mayor during Kolhapur Municipal Corporation
BJP’s Rupa Rani Nikam elected Mayor and Janasurajya Shakti’s Akshay Jarg becomes Deputy Mayor during Kolhapur Municipal Corporation elections, reflecting last-minute political negotiations and alliance realignment.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवड आज (शुक्रवारी) पार पडली. या निवडणुकीत महापौरपदावर भाजपच्या रूपाराणी निकम आणि उपमहापौरपदावर जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे जनसुराज्य पक्षाचे जरग हे एकमेव नगरसेवक आहेत. सभागृहात जरग यांना महायुतीकडून 46 मते मिळाल्याने ते विजयी झाले.

महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्र महायुती म्हणून लढत होते. त्यांच्या विरोधात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष देखील होता. मात्र, तरी देखील सत्ता स्थापना वेळी जनसुराज्य शक्तीने शिवसेनेला पाठिंबा दिला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या वाटाघाटीत जनसुराज्य शक्तीने हे पद मिळवले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महायुतीतून बाहेर पडत जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि चौथी आघाडी स्थापन करून 29 जागा लढवल्या. या 29 जागांपैकी केवळ एकाच जागेवर जनस्वराज्य शक्तीला यश मिळाले. जनसुराज्य पक्षाकडून अक्षय जरग हे एकमेव नगरसेवक बनले. वडील विक्रम जरक हे सुरुवातीपासूनच काँग्रेसचे असल्याने अक्षय जरग हे पाठिंबा कोणाला देणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

शिवाय स्थायी समिती सदस्यपदावर देखील महायुती आणि काँग्रेसची सदस्य संख्या समान असल्याने जरग ज्यांच्या बाजूने जातील तिकडे स्थाय समिती सभापतीला कौल असणार हे जवळपास निश्चित होते. महायुतीकडून भाजपकडून (BJP) महापौरपदासाठी रूपाराणी निकम तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेतून सत्यजित जाधव यांना देण्याचे जवळपास निश्चित झाले होते.

 Kolhapur Mayor Election News Update anasurajya Shakti’s Akshay Jarg becomes Deputy Mayor during Kolhapur Municipal Corporation
Kolhapur ZP Election : राजू शेट्टींची साथ सोडण्याची रिस्क, विधानसभा अन् नगरपरिषदेत मदत; त्यानंतरही यड्रावकरांकडून सावकार मादनाईकांचा गेम?

मात्र अखेरच्या क्षणी जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते समित कदम यांनी थेट आमदार राजेश क्षीरसागर यांचे घर गाठले. जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत जनसुराज्याने शिवसेनेला पाठिंबा दिला. बैठकीत पहिले उपमहापौर पद जनसुराज्याला द्यावे अशी इच्छा कदम यांनी व्यक्त केली. त्याला शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी देखील हिरवा कंदील दिला.

 Kolhapur Mayor Election News Update anasurajya Shakti’s Akshay Jarg becomes Deputy Mayor during Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Mayor Election : कोल्हापूरमध्ये 'भाजपराज', रुपाराणी निकम महापौरपदी विजयी; उपमहापौरपदी जरग!

केवळ इतकेच नव्हे तर जरग यांना पाच वर्षे स्थायी समिती सभापती मध्ये शिवसेनेच्या कोट्यातून सदस्य पद देण्याचीही मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे जरग हे एकमेव नगरसेवक असूनही त्यांना सत्तेच्या मुख्य वर्तुळात स्थान मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com