Baramati By Election .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Baramati nomination scrutiny : सुनेत्रा पवारांच्या विरोधातील सहा जणांचे अर्ज बाद, आता कितीजण मैदानात, उद्याचा दिवस निर्णायक

Baramati by poll News: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी करीत असताना दाखल करण्यात आलेल्या 59 उमेदवारी अर्जापैकी 53 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Pune News : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी करीत असताना दाखल करण्यात आलेल्या 59 उमेदवारी अर्जापैकी 53 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर सहा जणांचे अर्ज बाद झाले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी किती जण निवडणूक रिंगणातून माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक लागल्यापासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र या पोटनिवडणुकीसाठी ५९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळाई आहे. बुधवारी दुपारी उमेदवारी अर्जाची छाननी करीत असताना ५९ अर्जापैकी ५३ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर सहा जणांचे अर्ज छाननीवेळी बाद झाले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी किती जण निवडणूक रिंगणातून माघार घेणार याची उत्सुकता लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, निवडणूक रिंगणात काँग्रेसच्या उमेदवाराने एंट्री केल्याने निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता मावळली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार न देता निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. तर अचानक काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष गुरुवारी निवडणूक रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याकडे लागले आहे. काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रुपाने धनगर उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही लढाई अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बुधवारी सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला. बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल, असे फडणवीस यांनी या भेटीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT