Praful Patel News : मागील काही काळापासून प्रफुल पटेल हे नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातून काही जण त्यांना आणि तटकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा होती. आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी प्रफुल पटेल हे देखील उपस्थित राहणार आहेत.
बारामतीला रवाना होण्यापूर्वी प्रफुल पटेल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सर्व राजकीय पक्षांना हात जोडून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. ते म्हणाले, 'माझी सर्व पक्षांना विनम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या सुनेत्रावहिनींना बिनविरोध निवडून द्यावे. हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल.'
'सुनेत्रावहिनी पोटनिवडणुकीत उभ्या आहेत. बारामतीची जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडणूक देणार आहे. अजितदादांनी केलेल्या कामाची पावती देणार आहेत. पण आमची सोबत ही पण इच्छा होती की सगळ्यांनी दादांना स्मृतीला अभिवादन म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर उत्तम झाले असते.', असे देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अजुनही वेळ गेलेली नाही.त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचाही दिवस असले, माझी सर्व पक्षांना विनम्र विनंती आहे. अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करावी.'
ही निवडणूक बिनविरोध व्हावी,यासाठी आपण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. केरळ, तामिळनाडू आदी राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने ते त्यामध्ये व्यग्र आहेत. मला ते फोनवर उपलब्ध झाले नाहीत. मात्र,बारामतीसंदर्भात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी त्यांना निरोप दिला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये नक्कीच यावर तोडगा निघेल, असा विश्वास देखील पटेल यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.