Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांच्या आमदाराला मंत्रि‍पदाची ऑफर, भरकार्यक्रमात गोगावले म्हणाले, 'शिवसेनेत या अन्...'

Bharat Gogawale MLA Abhijeet Patil : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. या संपूर्ण दिवसभराच्या दौऱ्यामध्ये आमदार अभिजीत पाटील हे शिंदे यांच्यासोबत होते.

सरकारनामा ब्यूरो

Abhijeet Patil News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेचे नेते तथा ग्रामविकास व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी थेट मंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

मंत्री गोगावले कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिजीत पाटील हे दिवसभर फिरत होते. दरम्यान एका कार्यक्रमात मंत्री गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना शिंदे शिवसेनेमध्ये या, तुम्हाला मंत्री करतो, अशी ऑफरच दिली. मी माझे अडीच वर्षांचे मंत्रीपद तुमच्यासाठी सोडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार अभिजीत पाटील यांची अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली आहे. एकनाथ शिंदे पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. या संपूर्ण दिवसभराच्या दौऱ्यामध्ये अभिजीत पाटील हे शिंदे यांच्यासोबत होते. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बुलेट गाडीचे सारथ्यही केले होते.

त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना थेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अभिजीत पाटील हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का, अशी चर्चा आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.

अभिजीत पाटील काय म्हणाले?

अभिजीत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या मतदारसंघात आले होते. मतदारसंघाच्या विकास कामांबाबत त्यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या आहेत. शिवाय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करणे हे माझे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे. त्या भावनेनेच मी काल त्यांच्यासोबत होतो. मंत्री भरत गोगावले यांनी जी मला मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT