

Congress Win : भाजपला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यस्थानमधील 37 जिल्हा परिषदांची निवडणूक पार पडली. त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसला 24 जिल्हा परिषदांमध्ये विजय मिळाला आहे. तर, भाजपला सात जिल्हा परिषदांची सत्ता मिळाली आहे. एका ठिकाणी 'रालोपा' या पक्षाची सत्ता आली आहे. बाकी ठिकाणी त्रिशंकु अवस्था आहे.
राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, तरीदेखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्म यांना त्यांच्या जिल्ह्यातील सत्ता कायम ठेवता आली नाही. भरतपूर जिल्ह्यात भाजपचा सूफडा साफ झाला आहे.
जिल्हा परिषदेसोबतच 419 पंचायत समितींची निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये 269 पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसकडे बहुमत आहे. तर, भाजपला केवळ 73 पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळाली आहे. इतर ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे.
भाजपचा पराभव का?
भाजपच्या पराभवामागे अनेक कारणे सांगितली जात आहे. मुख्य म्हणजे स्थानिक आमदारांविषयी असलेली नाराजीचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. तिकीट वाटपात देखील परिवारवादाचे आरोप होत असताना बदल करण्यात आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा गृह जिल्हा असलेल्या भरतपूर जिल्हा परिषदची सत्ता भाजपला मिळवता आली नाही. येथील ३१ जागांपैकी काँग्रेसने तब्बल २१ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली, तर, भाजपला अवघ्या नऊ जागांवर विजय मिळवता आला. मागील निवडणुकीत भाजपने १७ जागांवर विजय मिळविला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.