Eknath shinde, Devendra Fadanvis sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : पुन्हा मोठा ट्विस्ट ! आता शिंदेंनी फडणवीसांसमोर ठेवली 'ही' नवी अट

Political News : मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस गुरुवारी शपथ घेणार आहेत. दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर बुधवारी सकाळी शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर राज्यातील सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेणार आहेत. दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याबाबत सस्पेन्स कायम असतानाच बुधवारी सायंकाळी काळजीवाहु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. यावेळी शिंदेंनी मोठी अट घातली असल्याचे समजते. त्यावर फडणवीस यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवितो, असा निरोप दिला असल्याचे समजते.

ही बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली. बंद दाराआड दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यावेळी शिंदे (Eknath Shinde) यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली. जर देण्यात अडचणी असतील तर निर्णय होईपर्यंत हे पद रिक्त ठेवावे, अन्यथा चुकीचा मेसेज जाईल, असेही स्पष्टपणे सांगितले. त्यासोबतच गुरुवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचाच फक्त शपथविधी न करता सोबत काही आमदारांना देखील मंत्री पदाची शपथ द्यावी, अशी मोठी मागणी केली आहे.

या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीतील हायकमांडसोबत चर्चा करून दोन्ही अटीबाबत कळवितो, असे सांगितले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर आमदारांना शपथ घेण्याचा निर्णय झाला तर तीन पक्षाकडून प्रत्येकी पाच म्हणजेच 15 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री उशिरा जर निर्णय झाला तर संबंधित मंत्र्यांना रात्री उशिरापर्यंत शपथ घेण्यासाठी फोन जाण्याची शक्यता आहे, असे समजते.

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी 5 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. यावेळी पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह 19 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्रीगण शपथ घेणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT