Pune BJP sarkarnama
महाराष्ट्र

Chandrakant Patil : भाजपमधील राजकीय बेरोजगारीवर 'सव्वा वर्षांचा' उपाय : जिल्हा परिषद, महापालिकेमध्ये आणला नवा फॉर्म्युला

Political News : भाजपने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्यांना विविध पदावर संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजपकडे इच्छुक असलेल्या मंडळींचा कल अधिक आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकानंतर झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. तर काही ठिकाणची बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्यांना विविध पदावर संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजपकडे इच्छुक असलेल्या मंडळींचा कल अधिक आहे.

त्यामुळेच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिकेमध्ये आता पदाधिकारी व स्वीकृत नगरसेवकासाठी 'सव्वा वर्षांचा' नवा फॉर्म्युला राबवण्याचे प्लॅनींग केले आहे. या माध्यमातून त्यांनी भाजपमधील राजकीय बेरोजगारीवर उपाय शोधून काढला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 29 ठिकाणच्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी सर्वात जास्त इच्छुक भाजपकडे होते. त्यावेळी बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना स्वीकृत नगरसेवकाचे आश्वासन दिले होते. आता निवडणुका पार पाडल्या जवळपास २० पेक्षा अधिक महापालिकेत भाजपचा महापौर झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी सत्तास्थापन करीत असताना महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांच्यासाठी भाजपने महापालिकेमध्ये पदाधिकारी निवडीसाठी 'सव्वा वर्षाचा' (15 महिने) नवा फॉर्म्युला राबवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.

भाजपमध्ये (BJP) सध्या नेत्यांची संख्या मोठी आहे. जर एकाच नेत्याने 5 वर्षे पद भोगले, तर इतर कार्यकर्ते निराश होऊन पक्ष सोडू शकतात. हा धोका ओळखून चंद्रकांत पाटील यांनी आता सांगली, कोल्हपूर व पुणे महापालिका व जिल्हा परिषदेत पदधिकारी व स्वीकृत नगरसेवकासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता सव्वा वर्षाचा नवा फॉर्म्युला राबविण्याचे धोरण अवलंबले आहे.

यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये पदाधिकारी निवडीसाठी 'सव्वा वर्षाचा' फॉर्म्युला राबवला होता. याअंतर्गत, अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन नेत्यांना सव्वा-सव्वा वर्षासाठी अध्यक्ष किंवा पदाधिकारी पद देण्याचे वाटप महापालिकेमध्ये पदाधिकारी निवडीसाठी राबवला होता. त्यामुळेच परत एकदा हा सव्वा वर्षाचा नवा फॉर्म्युला राबविण्याचे ठरवले आहे.

सोलापूर महापालिकेत भाजपच्या वाट्याला दहा पैकी आठ स्वीकृत नगरसेवक पदाच्या जागा येत आहेत. त्या आठ जागासाठी जवळपास 400 इच्छुकांनी भाजपकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे यामधून किती जणांना संधी दिली जाणार यावरून कस लागणार आहे. त्यामुळेच आता भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचवलेला जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महापालिका निवडीसाठी 'सव्वा वर्षाचा' फॉर्म्युला राबविला जाण्याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT