NCP Setback : गोगावलेंना शह देण्यासाठी तटकरेंकडून राष्ट्रवादीचा बळी? रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद तिसऱ्या नंबरवरील भाजपकडे जाण्याची शक्यता

sunil tatkare strategy bharat gogawale setback politics : रायगड जिल्हा परिषदेत सध्या सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या राजकीय हालचालींमुळे जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेचा वाटा न देण्याचा निर्धारच राष्ट्रवादीने केल्याचे दिसत आहे.
zilla parishad Politics; ravindra chavan meets sunil tatkare
zilla parishad Politics; ravindra chavan meets sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

  2. भाजपने ‘किंगमेकर’ची भूमिका घेत अध्यक्षपद आपल्या बाजूने वळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  3. सुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे शिंदे गटाला विरोधी बाकावर बसावे लागू शकते आणि भरत गोगावलेंना धक्का बसण्याची चर्चा आहे.

raigad News : रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सी खेच होताना दिसत आहे. मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सुत्रे हालवली आणि रायगडमधील राजकीय समीकरणं फिरली आहेत. एकीकडे भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा केली. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तटकरेंची भेट घेत यावर शिक्कामोर्तब केला. यामुळे येथे भाजप, राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठीच तटकरेंनी ही खेळी खेळल्याची जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.

रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असतानाच जिल्हा आणि राज्यपातळीवर गेल्या दोन दिवसात मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. ज्यात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा दावा, भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांची राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा केली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तटकरेंची घेतलेली भेट जिल्ह्याचे राजकीय गणितं बदलणारी ठरली आहेत. तर स्पष्ट बहुमतासाठी निर्माण झालेली त्रिशंकू परिस्थितीही निवळली आहे.

सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली 'मॅजिक फिगर' त्यांच्याकडे नाही. बहुमतासाठी शिवसेनेला अजून नऊ सदस्यांची गरज आहे. यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आपल्या सोबत येईल असे म्हणत मुंबई आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह फडणवीस यांची भेट घेतली होती. पण त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही.

zilla parishad Politics; ravindra chavan meets sunil tatkare
Dharashiv Zilla Parishad politics : सत्ता स्थापनेचा मॅजिक आकडा जुळला? भाजपचं ठरलं; धाराशिव झेडपीत शिंदे शिवसेना सत्ताबाहेर?

उलट दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मिळून तब्बल ३१ सदस्यांचे संख्याबळ आहे, जे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे. तर या सत्तासंघर्षात 'किंगमेकर'च्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवण्याच्या अनुषंगाने तटकरेंनी खेळलेल्या खेळीचा फायदा 'कमळा'ला होणार आहे.

दरम्यान कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी गट नोंदणीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीने सर्व सदस्य रक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून एकाच ठिकाणी सर्व सदस्य ठेवण्यात आले आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी-भाजप युतीच्या घोषणेनंतर सत्तास्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.

फॉर्म्युला आणि संभाव्य सत्तावाटप

सत्ता स्थापनेच्या नव्या समि‍करणांमुळे भाजपकडे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपदासह अर्थ आणि बांधकाम समित्या जाऊ शकतात. तसेच अध्यक्षपदाचा फॉर्म्युला हा अडीच वर्षे किंवा सव्वा सव्वा वर्षांचा राहू शकतो.

शिंदे बाजी फिरवू शकतात

एकीकडे तटकरेंनी जिल्हा पातळीवर भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांच्या तोंडून युतीची घोषणा करवून घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सत्तेत राहण्यासाठी भाजपला आयती संधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादामुळे मिळाली आहे. तटकरे यांनी देखील शिवसेनेला बाजूला सारण्यासाठी भाजपशी हात मिळवणी केली आहे. यातूनच सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात मार्ग काढू शकतात. आणि राज्या प्रमाणेच जिल्ह्यातही तिन्ही पक्ष महायुती म्हणून सत्तेत येऊ शकतात. मात्र यासाठी अद्याप कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत.

zilla parishad Politics; ravindra chavan meets sunil tatkare
zilla parishad Politics : सांगलीत राजकीय तापमान वाढले? व्हिप मोडला तर जागेवरच अपात्र! चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीच्या सदस्यांना गर्भित इशारा

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती का निर्माण झाली?
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

2. भाजपची भूमिका काय आहे?
भाजपने निर्णायक ‘किंगमेकर’ची भूमिका घेत अध्यक्षपद मिळवण्याची शक्यता आहे.

3. सुनील तटकरे यांची रणनीती काय मानली जाते?
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची अप्रत्यक्ष रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

4. शिंदे गटाची स्थिती काय आहे?
सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे गटाला विरोधी बाकावर बसावे लागू शकते.

5. भरत गोगावलेंना कसा धक्का बसू शकतो?
सत्तास्थापनेत अपेक्षित भूमिका न मिळाल्यास त्यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com