Nitin Gadkari. Sarkarnama
महाराष्ट्र

Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

Political News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसापासून सक्रिय झाले आहेत. राज्यभरात त्यांच्या सभा होत असून त्यांच्या सभाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. मतदानासाठी सात दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असताना प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. महायुती व महाविकास आघाडीने जोराची ताकद लावली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मनसे, एमआयएम, वंचित आघाडीसह छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे चुरस वाढली असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी एका मुलखतीप्रसंगी राज्याच्या राजकारणात परतण्याबाबत मोठं विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) गेल्या काही दिवसापासून सक्रिय झाले आहेत. राज्यभरात त्यांच्या सभा होत असून त्यांच्या सभाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रचारात व्यग्र असतानाही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का? यावर वक्तव्य केले आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा परत यावे असे वाटत नाही का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'आता मी दिल्लीत गेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. माझे क्षेत्रही बदलले आहे. राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली तरी मला इच्छा नाही. राज्य सांभाळण्यासाठी भाजपमध्ये अनेकजण सक्षम आहेत,' असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या राजकारणात झालेल्या राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. आम्ही शेतमालाला योग्य हमीभाव दिला आहे. त्याचा शेतक-यांना नक्कीच फायदा होईल. मात्र सध्याची पिकाची परिस्थिती पाहता देशातील पीक पद्धत बदलण्याची गरज आहे, असे मतही नितिन गडकरींनी व्यक्त केले.

तुमच्यावर विरोधक फारशी टीका करत नाहीत? असे विचारले असता गडकरी म्हणाले "मी काही कुशल राजकारणी नाही. मी सामान्य व्यक्ती आहे. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. मी छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे, दोन रेषा आहेत एक आपली आणि एक दुसऱ्यांची. आपली मोठी करायची आणि दुसऱ्यांची पुसण्याचा प्रयत्न केला की आपली मोठी होती. पण मी मी पहिले ठरवले आपली रेषा मोठी करायची. आपलं काम करत राहयचे, त्यानुसार काम करीत आहे. .

पक्षफुटीची सहानुभूती उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) शरद पवारांना मिळणार नाही. सहानुभूतीच्या मुद्याबाबत नितीन गडकरी साशंक आहेत. पक्षफुटीची सहानुभूती मिळणं कठीण वाटत असल्याचे गडकरी म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभेत राज्यात महायुती बॅकफुटवर गेली असली तरी येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत तशीच परिस्थिती राहणार नाही, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT