Mumbai News: राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या सातपैकी सहा जागा महायुतीच्या वाट्याला येणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या चार जागा आहेत. या भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी जवळपास 25 नेते इच्छुक आहेत. या इच्छुकांच्या नावाची यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यातच आता राज्यसभा निवडणुकीबाबत दिल्लीतून मोठी अपडेट आली आहे. भाजप उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्लीतून करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.
राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या 25 जणांच्या नावाची यादी दोन दिवसापूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत फायनल करण्यात आली होती. ही 25 जणांच्या नावाची यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तातडीने दिल्लीत दाखल झाले होते. या नावावर शुक्रवारी दिल्ली दरबारी चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर या चार नावांची घोषणा दिल्लीतून 2 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याबाबतचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात भाजपच्या (BJP) वाट्याला येत असलेल्या या चार जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच मंगळवारी रात्री भाजपच्या प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यामध्ये 25 जणांच्या नावाची यादी फायनल करण्यात आली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत.
त्यांचा कार्यकाळदेखील एप्रिलमध्ये संपणार आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या चारपैकी एका जागेवर आठवले यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे. पण मित्रपक्षाच्या नेत्याच्या नावाची शिफारस करणे हा विषय प्रदेश कोअर कमिटीच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे याबद्दलचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल. तर दुसरीकडे माजी मंत्री भागवत कराड, खासदार धैर्यशील पाटील यांची मुदत संपत आहे. त्या दोघांची नावेही या 25 जणांच्या यादीत आहेत. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
फायनल करण्यात आलेल्या 25 जणांच्या नावाची यादी घेऊन शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. या नावावर आता दिल्ली दरबारी होत असलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर दिल्लीतूनच फायनल नावाची घोषणा करण्यात येणार आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे समजते.
राज्यातील 4 जागांसाठी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीने 25 नावांची यादी तयारी केली आहे. या नावांमधून भाजप नेतृत्त्व कोणाची निवड करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. भाजपच्या या यादीत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार प्रीतम मुंडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार कुणाल पाटील, माधव भांडारी यांच्यासह 25 जणांची नावे आहेत.
दोन दिवसापूर्वी राज्यात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, अमित साटम उपस्थित होते. आता केंद्रीय कोअर कमिटीची बैठक दिल्लीत होणार असून त्यामध्ये 25 पैकी चार नावे फायनल होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.