Amit Shah-Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Mission : भाजपकडून मिशन 2029ची तयारी; निवडणुकांमध्ये 'नंबर वन'चा पक्ष ठरण्यासाठी आखली आक्रमक रणनीती

BJP Number One Party 2029 News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप मित्रपक्षांच्या विरोधात निवडणूक लढत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप मित्रपक्षांच्या विरोधात निवडणूक लढत आहे. याकडे मिशन 2029 ची तयारी म्हणून पाहिले जात आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शहांनी आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत.

राज्यात 2014 ते 2o24 या दहा वर्षात विधानसभेच्या 3 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका झाल्या. या निवडणुका भाजप कधी स्वबळावर, तर मित्रपक्षांसोबत युती करत लढला. पण भाजपच्या मतांची टक्केवारी 25 ते 28 च्या दरम्यान राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात एकहाती सत्ता आणायची असल्यास भाजपला किमान 40 टक्के मते मिळवावे लागणार आहेत. त्यासाठीची रणनीती भाजपने आखली आहे. त्यादृष्टीने आता राज्यात काम करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप 2029 मध्ये राज्यात स्वबळावर लढेल, ही घोषणा शहांनी च केली. भाजपला राज्यात कुबड्यांची गरज नाही, असे विधान शहांनी गेल्याच महिन्यात केले आहे. त्यासाठी भाजपने गेल्या वर्षभरात पद्धतशीरपणे प्रयत्न केले आहेत. आता भाजपने आपला मतांचा टक्का वाढवण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या होत्या. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत युतीत निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपने 26.77 टक्के, तर शिवसेनेने 12.38 टक्के मते घेतली. राष्ट्रवादीला 9 टक्के मतदान झाले. 2029 मध्ये भाजपला स्वबळावर लढायचे आहे. त्यासाठी भाजपला 40 टक्क्यांचा टप्पा ओलांडावा लागणार आहे.

त्यासाठी भाजपकडून (BJP) नियोजन केले जात आहे. वैद्यकीय मदत कक्षाने सामाजिक संस्थांच्या मदतीने तीन मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जातीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंजारा, लमाणी, वाल्मिकी या सारख्या समूहांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. या जातींना सोबत आणून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे समजते.

या कार्यक्रमांची सुरुवात नागपूरपासून होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुसरा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत नवी मुंबईत होईल. तर तिसरा आणि शेवटचा कार्यक्रम नांदेडमध्ये आयोजित केला जाईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT