BJP MLA Parinay Fuke Son Accident  sarkarnama
महाराष्ट्र

BJP MLA Son Accident : भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एक तरुणाचा मृत्यू , मद्यधुंद अवस्थेत...; काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress Alleges MLA Parinay Fuke : अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Roshan More

Accident News : मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ते म्हणाले, एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे!

ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळून जात आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आमदारांची पोरं मात्र भरधाव वेगाने गाड्या फिरवत आहेत कुणाचा जीव गेला तरी यांना कुठे फरक पडतो? चार दिवसांपूर्वी पेंच अभयारण्य मध्यप्रदेशकडून नागपूरला येताना या गाडीचा एक्सीडेंट झाला. भरधाव वेगाने पाच मुले पाच मुली दारूच्या नशेत गाडी चालवत असताना हा एक्सीडेंट झाला.

यर्थाथ फुकेही गंभीर जखमी

दिशांत अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती अति गंभीर आहे.मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस स्टेशन नोंद झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांचा मुलगा ही गाडी चालवत होता. ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी सुद्धा फुके यांच्याच नावावर आहे. गाडी चालक यर्थाथ परिणय फुके गंभीर जखमी, सर्वजण मोठ्या प्रमाणात दारु पिऊन होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT