Narayan Rane, Aditya Thackeray, Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Narayan Rane News : भाजप खासदार नारायण राणेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाले,'उद्धव ठाकरेंनी मला फोन केला अन् आदित्यला...'

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद गेल्या दोन दशकापासून आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांचा ही आडवा विस्तव जात नसल्याने एकमेकांवर नेहमीच आरोप करीत असतात. नुकताच मालवणमधील राजगडावर पुन्हा हा संघर्ष उफाळून आल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी नारायण राणे, नीलेश राणे व आदित्य ठाकरे समर्थक समोरा-समोर आल्यानंतर पुन्हा हे दोन गट एकमेकाना भिडले. त्यामुळे चांगलाच राडा झाला.

नारायण राणे जेंव्हा शिवसेनेत होते तेंव्हाही उद्धव ठाकरेविरुद्ध राणे हा संघर्ष होता. त्यानंतरच्या काळात राणे काँग्रेसमध्ये (Congress) गेले तेंव्हाही हा संघर्ष होता. त्यातच राणे यांच्याकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Narayan Rane News )

गेल्या दोन दशकाच्या कारकिर्दीत राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष तसुभरही कमी झाला नाही. उलट तो संघर्ष वाढतचं गेल्याचे आपल्याला बघायला मिळतेय. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. नारायण राणे यांच्याकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.

दुसरीकडे राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे विधानसभेत बंद लिफाफ्यात सादर केले होते. या प्रकरणी तपास सुरु आहे. पण अद्याप त्याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा त्यांनी केला.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूआधी दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन ही सुशांतची माजी मॅनेजर होती. सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्याआधी दिशाचा मृत्यू झाला होता. दिशा घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला दिशाने आत्महत्या केल्याची चर्चा होती.

या प्रकरणावरुन राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे संबंधित प्रकरणाला वेगळे वळण लागले. याच प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव येऊ नये किंवा आदित्य यांचं नाव घेऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोन आला होता, असा मोठा दावा राणे यांनी केला आहे.

यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले, “ त्यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला होता. आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत, असे मला फोनवर उद्धव ठाकरे बोलले होता. मग मी सांगितलं तुमच्या मुलाला असे संध्याकाळी सातच्यानंतर बाहेर सोडू नका, असा टोला राणे यांनी लगावला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेवेळी राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोडो मारो आंदोलनाला प्रत्युत्तर दिले. “त्यांना दुसरं काय येतं, जोडो मारो आंदोलन करणारे पुतळा उभारल्यानंतर आठ महिन्यात एकदा तरी नतमस्तक होण्यासाठी आले का? हे सगळं झाल्यानंतर डोकं आपटून घेत आहेत, अशी टीका राणे यांनी केली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही राणे यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT