Yogi Adityanath, Devendra Fadanvis Sarkarnama
महाराष्ट्र

BMC Election: बीएमसी निवडणुकीसाठी भाजपचे मायक्रो प्लॅनिंग ! योगी आदित्यनाथसह स्टार प्रचारकांची तगडी फौज मैदानात उतरविणार !

BJP Mumbai Political News : मुंबईतील विविध भाषिक मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यावर भाजपकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठीच आता भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह स्टार प्रचारकांची तगडी फौज मैदानात उतरविण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai Election : मुंबई महापालिकेतील महायुतीच्या जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी एकीकडे भाजपची बैठक होत आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असून दुसरीकडे भाजपकडून आगामी काळात होत असलेल्या बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यासाठी मुंबईतील विविध भाषिक मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यावर भाजपकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठीच आता भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह स्टार प्रचारकांची तगडी फौज मैदानात उतरविण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या काळात मुंबईतील विविध भाषिकांच्या मतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार प्रचारकांची मोठी फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्या निर्णायक आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावरील बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याचा प्लॅन तयार ठेवला आहे. जानेवारी महिन्यात हे दिग्गज नेते मुंबईच्या विविध भागात रोड शो आणि जाहीर सभा घेणार आहेत.

मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा मोठा प्रभाव आहे. पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य मतदारांमध्ये कमालीची लोकप्रियता असलेले नेते आहेत. हेमंत बिस्वा सरमा हे आसामचे मुख्यमंत्री असून हिंदुत्ववादी नेते म्हणून देखील ओळखले जातात. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील प्रचारात सहभागी होऊ शकतात.

भाजपकडून जोरदार तयारी

महापलिका निवडणुकीसाठी भाजपने (BJP) केवळ मोठ्या सभांवर भर न देता, प्रत्येक वॉर्डमधील मतदारांच्या रचनेनुसार प्रचार करण्याची योजना आखली आहे. कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या भाषिक मतदारांचे प्राबल्य आहे, त्यानुसार त्या राज्यातील स्टार प्रचारकाला तिथे पाठवले जाणार आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे हे महायुतीसाठी प्रतिष्ठेचे असून, भाजप यावेळेस कोणतीही कसर सोडण्यास तयार नाही.

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

मुंबई महापलिका निवडणुकीसाठी महायुतीची दुसरी बैठक 'वसंत स्मृती' कार्यालयात होणार आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि मंगलप्रभात लोढा यांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT