NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

Thane municipal elections : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जागावाटपावरून येथे महायुतीत खटके उडताना दिसत आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने महायुतीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे.

  2. प्रभागनिहाय इच्छुकांकडून आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

  3. सन्मानजनक जागावाटप न झाल्यास अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

Thane News : राहुल क्षीरसागर

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाकडून प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पक्षाने दिली आहे. तसेच महायुतीमध्ये सन्मानजनक जागावाटप न झाल्यास अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

२०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्या वेळी पक्षाचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्याच धर्तीवर यंदाही किमान तेवढ्याच जागांची मागणी महायुतीकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र ही मागणी मान्य न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक रणांगणात उतरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

भाजपसोबत थेट युती करण्याबाबत अजित पवार गटात संभ्रम असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये मतांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, ठाण्यात भाजपसोबत जाण्याबाबत पक्ष सावध असल्याचे दिसून येते. मात्र, महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आमच्या पाठिंब्याशिवाय पर्याय नाही, असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.

Ajit Pawar
NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीची युती कन्फर्म! अजितदादांच्या शिलेदाराची अमित शाहांशी चर्चा : दिल्लीतून ग्रीन सिग्नल

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्धार पक्षाने केला असून, पूर्णपणे नवी टीम उभी करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रचाराला सुरुवात होताच ठाण्यात मोठ्या राजकीय हालचाली घडतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

कार्यकर्त्यांना न्याय देणे हेच आमचे प्रमुख धोरण असून, केवळ सत्ता मिळवण्यासाठी युतीच्या मागे धावणार नसल्याचेही स्पष्ट शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी, इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. मात्र महायुतीत योग्य सन्मान न मिळाल्यास आम्ही सर्व १३१ जागांवर उमेदवार देण्यास तयार आहोत, असाही इशारा दिला आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महायुतीबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र प्रत्येक घटक पक्षाचा योग्य मान-सन्मान राखला जाईल.

ठाणे महापालिकेतील सर्व १३१ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे. शिंदे गट आणि भाजपकडे अधिक संख्याबळ असल्याने महायुतीत आपली कोंडी होत असल्याची भावना अजित पवार गटात असून, त्यामुळेच पक्षाने दबाव वाढवण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar
NCP Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोडली महायुतीची साथ! ठाणे महापालिका स्वबळावर लढणार

FAQs :

1. अजित पवार गटाने किती अर्ज मागवले आहेत?
➡️ आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

2. अजित पवार गटाची मुख्य मागणी काय आहे?
➡️ महायुतीत सन्मानजनक जागावाटप, विशेषतः किमान ३५ जागांची मागणी आहे.

3. २०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी कशी होती?
➡️ त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती आणि ३५ नगरसेवक निवडून आले होते.

4. जागावाटप मान्य न झाल्यास काय पर्याय आहे?
➡️ अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवू शकतो.

5. या भूमिकेचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ जागावाटपावर तणाव वाढून महायुतीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com