Chandrakant Patil sarkarnama
महाराष्ट्र

Chandrakant Patil On Mahayuti : 'महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर...' ; चंद्रकांत पाटलांचं विधान!

Chandrakant Patil Reaction on Eknath Shinde Press : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Chandrakant Patil News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर बसणार आहे. लवकरच महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

शिवाय, आतापर्यंत शिवसेना(Shivsena) आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपपदावरून रस्साखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. शिवाय, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडूनही तशाप्रकारची वक्तव्य केली जात होती. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेत, मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे दिसून आले आहे. त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यास पाठिंबा दर्शवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या या भूमिकेचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पत्रकारपरिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत जाहीरपणे आभारही मानले आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपचे(BJP) राज्यातील प्रमुख नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ''विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अभूतपूर्व असे यश दिले. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या संदर्भात भाजपाचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय शिवसेनेला मान्य असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल शिंदे यांनी जो सन्मान दाखवला, तो कौतुकास्पद आहे. ''

तसेच ''महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर वैचारिक समरसता असलेली नैसर्गिक युती आहे, हेच शिंदे यांनी सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाबद्दल योग्य तो निर्णय घेतीलच. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचाच असेल, यात शंका नाही. त्या निर्णयाचे स्वागत करून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अन्य घटक पक्ष महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे.'' असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT