Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यापूर्वीच नाराज भुजबळांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, 'काहीजण कष्ट न करताही...'

NCP Rajya Sabha ticket News : राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी विदर्भातील प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी विदर्भातील प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा माध्यमात रंगली आहे. त्यातच माध्यमाशी बोलताना सूचक वक्तव्य करीत असतात. गेल्या तीन दिवसात त्यांनी सूचक आणि अर्थपूर्ण वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा होत आहे. त्यापूर्वीच नाराज असलेल्या भुजबळांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्याची चर्चा सध्या माध्यमात रंगली आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गेल्या एकही दिवसापासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती. भाजपकडून यासंदर्भात लगेच निर्णय होऊ न शकल्याने भुजबळ यांनी राज्यसभेवर जाणे टाळले. त्यामुळे राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे माध्यमांत छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात. पक्षासाठी एक-एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मतं मांडतो.' त्यामुळे भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पक्षातील इतर नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय आहे, तो मला मिळावा, अशी इच्छा भुजबळ यांनी बोलून दाखवली होती. यानंतर छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा सूचक वक्तव्ये केली आहेत. नमस्कार ताकदीला होतो, चमत्काराला होतो. तुमच्या पाठी आमदार किती, खासदार किती, नगरसेवक किती यावर सगळे निर्भर असते, असेही छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्त्वाखाली मोठी प्रगती करेल. अजित पवार सोडून गेले, त्यानंतर सुनेत्राताई पुढे आल्या आहेत. अनेकांना वाटते आम्हाला पक्षाने काही दिले नाही. प्रत्येकाने काम करत राहिले पाहिजे. पदे कमी असतात, पण पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. एकजुटीने काम करत राहावे, असे सांगतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी साजरा होणार आहे. यावेळीही भुजबळ काय बोलणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT