Mumbai News : राज्यात 1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. त्यातच त्यावेळी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण गाजत होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेतले जात होते. जानेवारी 2003 मध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्रिपदाचाही छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांच्या माथ्यावर हा तेलगी प्रकरणातील आहे, असा शिक्का बसला होता. त्यावर आज 21 वर्षांनंतर प्रथमच छगन भुजबळ यांनी पुण्यातील एका प्रकट मुलाखतीप्रसंगी यावर भाष्य केले.
पुण्यात माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकट मुलाखत पार पडली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. भुजबळ यांची राजकीय कारकीर्द नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. 1999 साली ते राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी तेलगी घोटाळा प्रकरणामुळे त्यांच्यावर आरोप केले जात होते. त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता तब्बल 21 वर्षांनी छगन भुजबळ यांनी या प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
या मुलाखतीत छगन भुजबळांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला. “तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यात होते, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात गेलो. हे प्रकरण सीबीआयकडे घ्या अशी मी मागणी केली. ट्रकभर कागद आणले. त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हते. ज्या प्रकरणी माझे नाव सीबीआयनेही घेतले नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री होते त्यावेळी कोरोना आला. त्यांनी दोन वर्ष चांगले काम केले. परंतु त्यांचा शारीरिक आजार हा त्यांना अडचणीचा होता. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते. त्यांना मंत्रीपदाचा अनुभव नव्हता. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे माझा छगन शरद घेऊन गेला. बाळासाहेबांचे शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, असेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले
येत्या काळात तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल छगन भुजबळांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी फारच थेट भाषेत उत्तर दिले. “राज्यपाल बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु. माझं काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणं. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का, बोलू शकणार आहे का? असा सवाल छगन भुजबळांनी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.