Sunil Tatkare & Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar: भुजबळांनी सुरुवात केली, अजितदादांनी निर्णय उचलून धरला: राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदारांना सूचना

Bhujbal Ajit Pawar NCP News : बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्याला गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे तर शेती तर पार खरडून गेली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ७० लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्याला गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे तर शेती तर पार खरडून गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकार धावून आले आहे.

त्यातच आता मंत्री छगन भुजबळांनी एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता हा निर्णय उचलून धरला असून आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदारांना एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. अजित पवार यांनी बुधवारी पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्नधान्य वाटपास सुरुवात

राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 2654 कुटुंबाना मदत केली आहे. साडेसव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT