Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal Devendra fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : "दोन नाटकांच्या स्क्रिप्टवर काम करतोय, पहिली...", फडणवीस-जरांगे वादावर भुजबळांची टोलेबाजी

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : "मारुतीच्या शेपटीप्रमाणे जरांगे-पाटलांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत," अशी टीका भुजबळांनी केली.

Akshay Sabale

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी ( 25 फेब्रुवारी ) आरोपांच्या फैरी झाडल्या. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी टोलेबाजी केली आहे. तसेच, "जरांगे-पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही," असं छगन भुजबळांनी सांगितलं. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Chhagan Bhujbal Latest News )

"अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं मला काम करूद्या. जरांगे-पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही. सध्या दोन जुन्या नाटकांच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. पहिली स्क्रिप्ट काशिनाथ घाणेकर यांची असून, 'जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते', असा त्याचा मथळा आहे. दुसरी स्क्रिप्ट, 'सीमेवरून परत जा,' अशी आहे," असं म्हणत भुजबळांनी टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मारुतीच्या शेपटीप्रमाणे जरांगे-पाटलांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे," अशी मागणी भुजबळांनी केली आहे.

"जो मनुष्य असंस्कृत आहे, ते असंच बोलणार... ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली आहे. जरांगेंनी मुंबईत येऊ दे किंवा दिल्लीत जाऊ दे ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही," असं छगन भुजबळांनी ठणकावून सांगितलं आहे.

जरांगे-पाटील काय म्हणाले होते?

रविवारी मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. "मला संपवण्याचं षड्यंत्र देवेंद्र फडणवीसांनी रचलं आहे. त्यातून वेगवेगळी लोक पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल, तर मी 'सागर' बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT