Manoj Jarange Patil : "फडणवीसांना सुट्टी नाही अन् आणखी...", जरांगे-पाटलांचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Vs Eknath Shinde : "एकनाथ शिंदेंनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये," असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis Manoj Jarange Patilsarkarnama

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर जरांगे-पाटल मुंबईत सागर बंगल्याकडे निघाले आहेत. पण, सध्या जरांगे-पाटील जालना जिल्ह्यातील भांबेरी गावात थांबले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून जरांगे-पाटील देवेंद्र फडणवीसांवर संतापले आहेत. ( Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Latest News )

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, "अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्याचं कारण काय? आम्हाला जाऊ द्यायचं नाही. फडणवीसांना संचारबंदीच्या आड लपायचं आहे का? फडणवीसांच्यात दम होता, तर येऊन द्यायचं होते. मी फडणवीसांकडे बघणार आहे. पण, सर्वांनी शांततेत धरणे आंदोलनं करावीत."

"फडणवीसांना सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, अन्यथा याचा परिणाम सगळ्या जाती-धर्मात जाणार आहे. फडवीसांविषयी प्रचंड नाराजीची लाट सगळीकडे उसळणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी. आपल्याला विचार करून पुढील पावले टाकावी लागणार आहेत. घरात बसून मराठ्यांच्या जिवावर फडणवीस मोठे झाले आहेत. आता फडणवीस सत्ता कशी आणतात, ते पाहू," असं आव्हान जरांगे-पाटलांनी दिलं आहे.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Manoj Jarange News : जरांगेंचा फडणवीसांवर जीवे मारण्याचा आरोप; बच्चू कडूंचा सबुरीचा सल्ला, म्हणाले...

"एकनाथ शिंदेंनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सगेसोयऱ्याची अधिसूचना कुणी काढली? मग अंत कोण पाहतंय? फडणवीसांनी जाणूनबुजून संकट उभे केलं आहे. त्यामुळे आपण पुढं जाणं म्हणजे माझा हेकोखोरपणा आहे. गनिमी कावा करू... पोलिस आणि कायद्याचा मानसन्मान करून मराठ्यांनी राज्यात शांत राहावे. अंतरवालीत जाऊन तिथे निर्णय घेऊ," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Manoj Jarange News : दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव; मनोज जरांगेंनी सांगितलं मोठं कारण...

"सागर बंगल्यावर स्वागत आहे, असं फडणवीस म्हणाले. मग, संचारबदी लागू करणे, हे स्वागत आहे का? फडणवीसांना महाराष्ट्रात राहायचं आहे. आपल्यालाही राहायचं आहे. पण, सागर बंगल्यावर आमंत्रण देऊन दारे लावून घेतली. संचारबंदी उठवावी, मग मुंबईला येतो. तसेच, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या सहकाऱ्यांना सोडून देण्यास सांगावे," अशी विनंती जरांगे-पाटलांनी फडणवीसांना केली.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Ajit Pawar On Jarange : काहीही बोललो तरी खपतं, असं कुणी समजू नये; अजितदादांनी जरांगेंना खडसावलं!

"संचारबंदी लागू केल्यानं फडणवीसांना वाटेल सुट्टी मिळेल. पण, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही. तसेच, नाराजीची आणखी लाट उसळून घेऊ नये," असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

R

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांची भाषा राजकीय, त्यांच्या मागे कोणीतरी...'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com