Aurangzeb Tomb sarkarnama
महाराष्ट्र

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीला टाळे ठोकणारच! शौर्य प्रतिष्ठानचा गनिमी कावा पोलिसांनी उधळला

Sambhajiraje Shaurya Pratishthan : खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी मुंबईतून निघालेल्या शौर्य प्रतिष्ठानचा गनिमी कावा पोलिसांनी उधळला. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समृद्धी महामार्गावरच अडवले आहे.

Aslam Shanedivan

Sambhajinagar News : खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी जोर धरत असून नागपूरमध्ये यावरूनच दंगली पेटली. आता या मुद्द्यावरून जोरदार राजकीय वादंग वाढला असतानाच खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी आखलेल्या गनिमी कावा पोलिसांनीच उधळला आहे. कबरीला टाळे ठोकण्यासाठी जाणाऱ्या छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे प्रमुख बाळराजे आवारे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच रोखले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला असून त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी केली आहे.

'छावा' चित्रपटानंतर औरंगजेबाच्या मकबरीची चर्चा जोरात आली असून आता ती हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामागणीवरून राज्यभर आंदोलने केली जातायत. नागपूरमध्ये देखील करण्यात आलेल्या आंदोलनानंतर येथे दंगल उसळी. ज्यात दगडफेकीसह जाळपोळ करण्यात आल्याने एकाचा जीव गेला असून अनेक जखमी झाले आहेत. तर लाखोंचे नुकसान झाले आहे.

या दंगलीनंतर औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट सुरक्षा देण्यात आली असून तात्पुरती सुरक्षा भिंत देखील उभारण्यात आलीय. पत्रे मारून पोलिसांनी संरक्षक भिंत उभारली असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबरीकडे कोणालाही सोडले जात नाही.

अशातच या कबरीला टाळे ठोकू असा इशारा छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाने दिला होता. तर यासाठी मुंबईहून शौर्य प्रतिष्ठाचे प्रमुख बाळराजे आवारे आणि त्यांचे कार्यकर्ते खुलताबादकडे शुक्रवारी (ता.21) निघाले होते. पण या सगळ्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच आडवले. त्यांना येथील अजिंठा इटरचेंज येथे रोखत जिल्ह्याबाहेर रवानगी केली. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान पोलिसांनी कितीही आडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गनिमा कावा करू. छत्रपतींच्या गनिम्यानेच त्या कबरीला कायमचे टाळे ठोकू, असा इशारा उंबरे यांनी या वेळी दिला आहे. औरंगजेबाची कबर या राज्यात नकोच. तिचे उदात्तीकरण होऊ नये यासाठी कबरीला टाळे ठोका अशी मागणी काहीच दिवसांपूर्वी शौर्य प्रतिष्ठाने केली होती. तर मागणी मान्य न झाल्यास आपणच टाळे ठोकू असा इशारा दिला होता.

या इशाऱ्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शौर्य प्रतिष्ठाच्या कार्यकर्ते आणि उंबरे यांना जिल्हाबंदीचे आदेश काढले होते. तरिही उंबरे यांनी छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. यावेळी त्यांना ग्रामिण पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच रोखले. यावरून उंबरे आणि पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर कार्यकर्तांसह राजश्री उंबरे यांना पोलिसांनी जिल्ह्याबाहेर नेत कुंभेफळा येथे नजरकैद केले.

काहीही करा टाळे ठोकणारच

आता हा वाद चिघळला असून उंबरे यांनी पोलिसांसह सरकारला इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा स्थळांचे संरक्षण करणे सरकारचे काम असताना ते केलं जात नाही. उलट औरंग्याच्या कबरीला संरक्षण दिलं जातय. ज्या औरंग्याने आपल्या राज्याचे हाल केले, हत्या केली त्याची कबर येथे कशाला हवी? त्यामुळे अशा या कबरीला टाळे ठोकणारच, आम्ही आता गप्प बसणार नाही, असा निर्धार राजश्री उंबरे यांनी केला आहे.

संचारबंदीत शिथीलता

दरम्यान नागपूरमधील हिंसाचारातमुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. यामुळे येथे जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंजमधील संचारबंदी पूर्णता: उठवण्यात आली आहे. तर कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत शिथिलता देण्यात आलीय. तर यशोधरानगरमधील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT