CIDCO Eknath Shinde Meeting  Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde decision on CIDCO home : दिलासादायक बातमी! सिडको घरांच्या दरात कपात? शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Eknath Shinde CIDCO meeting : घरखरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! सिडको घरांच्या दरात कपात होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. संपूर्ण माहिती इथे जाणून घ्या.

Rashmi Mane

CIDCO News : स्वतःचं हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक माहिती समोर येत आहे. सिडको घरांच्या दरात कपात होणार की नाही, याबाबत आज महत्त्वाची बैठक होणार असून सर्वसामान्य नागरिकांना या बैठकीमुळे दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची घरे अनेकांसाठी परवडणारा पर्याय मानली जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या बांधकाम खर्च आणि इतर कारणांमुळे सिडकोच्या घरांच्या किंमतीवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे दर कमी करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगरविकास विभागाच्या नेतृत्वाखाली आज सिडकोच्या घरांच्या किंमती आणि प्रलंबित प्रकल्पांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, अनेक प्रकल्पांमध्ये झालेल्या सोडतींमध्ये काही घरे न सुटल्याने त्या घरांचे दर पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच काही प्रकल्पांमध्ये काम पूर्ण झालं असलं तरी उच्च किंमतीमुळे अनेकांना घरे घेणे कठीण जात आहे.

आजच्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असून सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर दरकपात झाली, तर मध्यमवर्गीयांसह विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. परवडणाऱ्या घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनत चाललेला असताना असा निर्णय नागरिकांसाठी मोठी आशा ठरू शकतो.

सिडकोच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांमध्येही या निर्णयाचा थेट परिणाम दिसू शकतो. किंमती कमी झाल्यास रिक्त घरे विकली जाण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊ शकेल आणि नवीन प्रकल्पांसाठीही मार्ग मोकळा होईल. त्यामुळे संपूर्ण गृहनिर्माण व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे या बैठकीत नक्की काय भूमिका मांडणार आणि कोणता निर्णय जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना योग्य दरात घरे मिळावीत, हा मुख्य उद्देश ठेवून आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सरकारकडून घरांच्या दरात कपात करण्याबाबत सकारात्मक निर्णय आल्यास हजारो नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला नवी उभारी मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT