Congress Politics : विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी अजुनही महाविकास आघाडी एकत्र असल्याचे चित्र आहे. विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, काँग्रेसकडून विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यात येणार आहे, असे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.
विधानसभा सभागृहात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत. ठाकरेंचे 20 , काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांचे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरेंच्या पक्षा मिळण्याची शक्यता आहे. ते गृहीत धरून जर ठाकरेंच्या पक्षाला विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळत असेल तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे.
विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बोलणी सुरू असल्याची देखील माहिती आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी विशिष्ट सदस्य संख्या हवीच असा नियम नसल्याचा सांगण्यात येत आहे.
विधान परिषदेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे विधान परिषदेमधील आमदार राम शिंदे हे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. यामधील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. तर, 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात. राज्यपालांकडून 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते.
काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. त्याच सोबत काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.